Hindu marriage 
देश

"लग्न म्हणजे केवळ नाच-गाणी नाही.. आवश्यक विधींशिवाय झालेला हिंदू विवाह अमान्य"; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

Marriage without the necessary rites is invalid: आवश्यक विधी पार न पाडता केलेला हिंदू विवाह वैध किंवा मान्य ठरु शकत नाही, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- सुप्रीम कोर्टाने लग्नासंदर्भात महत्त्वाचा निर्णय दिला आहे. आवश्यक विधी पार न पाडता केलेला हिंदू विवाह वैध किंवा मान्य ठरु शकत नाही, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. हिंदू विवाह अधिनियम १९५५ नुसार हिंदू विवाहाची कायदेशीर आवश्यकता आणि पवित्रता याबाबत सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे.

कोर्टाने म्हटलं की, 'हिंदू विवाह वैध ठरण्यासाठी सप्तपदी (पवित्र अग्निभोवती सात फेरे मारणे) अशाप्रकारचे संस्कार आणि सोहळा केला जाणे आवश्यक आहे. या सोहळ्याला प्रमाण देखील आहे.' सुप्रीम कोर्टाने असंही म्हटलं की, हिंदू विवाह हे एक संस्कार आहे. हे काही सॉन्ग डान्स, वायनिंग-डायनिंगचे आयोजन नाही. ( marriage without the necessary rites is invalid)

हिंदू विवाह एक संस्कार असून भारतीय समाजात याला एक महान मूल्य गृहित धरुन उच्च दर्जा दिला पाहिजे. त्यामुळे आम्ही तरुण आणि तरुणींना आग्रह करतो की त्यांनी विवाह संस्थेमध्ये प्रवेश करण्याआधी याबाबत गांभीर्याने विचार करावा आणि भारतीय समाजातील ही संस्था किती पवित्र आहे याचा विचार करावा, असं न्यायमूर्ती बी नागरत्ना सुनावणीवेळी म्हणाले आहेत.

विवाह हा व्यवहार नाही

नाच-गाणे किंवा मद्य पिणे, जेवण करणे असा विवाहाचा अर्थ होत नाही. याशिवाय चुकीचा हट्ट धरुन हुंडा, गिफ्ट यांची मागणे करणे किंवा इतर वस्तूची देवाण-घेवाण करणे म्हणजे विवाह नाही. विवाह देवाण-घेवाण करण्याचा व्यवहार नाही. भारतीय समाजामध्ये विवाहाला अत्यंत महत्व आहे. पुरुष आणि महिला यांच्यामध्ये संबंध प्रस्थापित करण्याचा तो एक मार्ग आहे. भविष्यात तो अधिक विकसित होऊन कुटुंबामध्ये पती आणि पत्नीचा दर्जा घेतो असं कोर्टाने म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT