Mahatma Gandhi, History of august kranti 
देश

Mahatma Gandhi : इतिहास 8 ऑगस्टचा; महात्मा गांधीजींच्या चळवळीने ब्रिटीश राजसत्ता हादरली होती

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आजचा दिवस क्रांती दिन म्हणून ओळखला जातो.

सकाळ डिजिटल टीम

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आजचा दिवस क्रांती दिन म्हणून ओळखला जातो.

08 ऑगस्ट या दिवसाला भारतीय इतिहासात वेगळ स्थान आहे. हा दिवस स्वातंत्र्याच्या शेवटच्या युद्धाचा शंख म्हणून स्मरणात ठेवला जातो. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी चालवलेल्या 'भारत छोडो' आंदोलनाचा पाया या दिवशी घातला गेला. (BraveSalute) यानंतर संपूर्ण देश इंग्रजांविरुद्ध एकवटला आणि ब्रिटिश सरकारला गुडघे टेकावे लागले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा दिवस क्रांती दिन म्हणून ओळखला जातो. (AchievementsAt75) मुंबईतील ज्या मैदानावर ध्वजारोहनची सुरुवात झाली ती जागा क्रांती मैदान म्हणून ओळखली जाऊ लागली. (Mahatma Gandhi, History of august kranti)

दुसऱ्या महायुद्धात भारताची मदत घेऊनही इंग्रजांनी भारताला स्वतंत्र करण्याचे वचन पाळले नव्हते. अशी १९४२ ची ही गोष्ट आहे. (IndiaAt75) तेव्हा देशभर गांधीजींनी 'भारत छोडो' आंदोलन सुरू केले होते. 8 ऑगस्ट रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या मुंबई अधिवेशनात या आंदोलनाचा ठराव मंजूर करण्यात आला होता. परंतु त्यानंतर गांधींना पुण्यातील आगाखान पॅलेसमध्ये कैद करण्यात आले आणि जवळपास सर्व नेत्यांना अटक करण्यात आली होती. (BestofBharat)

अशा स्थितीत युवा नेत्या अरुणा आसिफ अली यांनी ९ ऑगस्ट रोजी मुंबईतील ग्वालिया टँक मैदानावर तिरंगा फडकवून 'भारत छोडो' आंदोलनाचा झेंडा उंचावला होता. गांधीजींनी अहिंसक आंदोलन पुकारले असले तरी या आंदोलनामुळे देशात अनेक ठिकाणी तोडफोड आणि हिंसाचारच्या घटना घडल्या होत्या. दुसर्‍या महायुद्धातून इंग्रजांचे कंबरडे मोडले होते आणि या चळवळीने ब्रिटीश राजवटीच्या शपेटीत शेवटचा खिळा ठोकला गेला होता.

देशात दरवर्षी हा दिवस ऑगस्ट क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो. ज्यामध्ये स्वातंत्र्य लढ्यात बलिदान दिलेल्या क्रांतिकारकांना श्रद्धांजली वाहिली जाते. यासोबतच महात्मा गांधींनी म्हणजेच बापूंनी दिलेली शिकवण आठवते जी सध्याच्या काळात देश विसरत चालला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sand Mining Ban: राज्यात अवैध वाळू उपसा बंद करण्याचे आदेश; मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका निकाली

Latest Marathi News Live Update : पिकाचा पंचनामा करताना तलाठ्याला सर्पदंश

Video: अन् त्याने जोरात आईला ओढलं; तीन वर्षांच्या चिमुकल्याने पाच सेकंदात वाचवला आईचा जीव

LPG Price Hike: दिवाळीच्या आधीच महागाईचा तडाखा; एलपीजी गॅसचे दर वाढले, तुमच्या शहरात किती झाली किंमत?

Kids Health: लठ्ठ मुलांना प्रौढावस्थेत आरोग्याचा गंभीर धोका 'या' समस्या उद्‍भवण्याचा तज्ज्ञांचा इशारा

SCROLL FOR NEXT