hit and run case 2 lacs rupees compensation in death case 50000 rupees to grave injury  
देश

'हिट अँड रन' पिडीतांना सरकारचा दिलासा; आता 8 पट वाढवून मिळणार मदत

सकाळ डिजिटल टीम

देशात कितीतरी लोक दररोज रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडतात, त्यानंतर मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना तसेच जखमींच्या उपचारासाठी पुरेशी मदत मिळत नाही. दरम्यान अशा नागरिकांच्या मदतीसाठी आता रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (Ministry of Road Transport and Highways) काही बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार अधिसूचनेनुसार, 1 एप्रिलपासून रस्ते अपघातात मृत्यूच्या प्रकरणांमध्ये 'हिट अँड रन' पीडितांच्या कुटुंबीयांना मिळणारी भरपाई ही आठ पटीने वाढवून 2 लाख रुपये केली जाणार आहे.

दरम्यान हिट अँड रन प्रकरणात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला मिळणारी भरपाई सध्या 12,500 रुपये आहे मात्र आता ती 50,000 रुपयांपर्यंत वाढवली जाणार आहे.

तसेच 'हिट अँड रन मोटार अपघात पिडीत भरपाई योजना, 2022 '(Compensation to Victims of Hit and Run Motor Accidents Scheme, 2022) ही योजना आता सोलाटियम योजना, 1989 (Solatium Scheme, 1989) ची जागा घेईल, असे मंत्रालयाने 25 फेब्रुवारी रोजी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.

2 ऑगस्ट 2021 रोजी मंत्रालयाने एक मसुदा योजना अधिसूचित केली होती. योजनेंतर्गत, मंत्रालयाने रस्ते अपघातांची डिटेल्ड रिपोर्ट आणि त्यांच्या दाव्यांच्या त्वरित निपटाऱ्यासाठी वेगवेगळ्या भागधारकांसाठी टाइमलाइनसह त्यांचे अहवाल देण्याची प्रक्रिया आणली आहे.

सरकार मोटार वाहन अपघात निधी (Motor Vehicles Accident Fund)ची स्थापना करणार आहे, ज्याचा वापर हिट अँड-रन प्रकरणांमध्ये नुकसान भरपाई आणि अपघातग्रस्तांवर उपचार करण्यासाठी केला जाईल. सरकारी आकडेवारीनुसार, 2020 मध्ये देशात 3.66 लाख रस्ते अपघात झाले, तर परिणामी 1.31 लाख लोकांचा मृत्यू झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

ढिंग टांग : वाजत गाजत या...!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT