holi 
देश

Holi 2021 - पंतप्रधान मोदींसह कमला हॅरिस यांनी भारतीयांना दिल्या होळीच्या शुभेच्छा

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - होळीचा सण भारतात उत्साहात साजरा केला जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेऊन होळी साजरी करण्याचं आवाहन सरकारकडून नागरिकांना करण्यात आलं आहे. होळीच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनीही भारतीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. मतभेद विसरून एकत्र या असा संदेश त्यांनी दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून होळीच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, सर्वांना होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा, आनंद, हसू आणि उल्हासाचा हा सण प्रत्येकाच्या जीवनात नवा उत्साह आणि नवीन उर्जा घेऊन येऊदे. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी म्हटलं की, रंगांचा हा सण सर्वांच्या आयुष्यात आनंद आणि उत्साहासह चांगलं आरोग्य आणि समृद्धी घेऊन येऊदे. 

देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं की, सर्व देशवासियांना होळीच्या पवित्र सणाच्या हार्दीक शुभेच्छा, रंग, एकता आणि सद्भावनेचा हा सण तुमच्या सर्वांच्या जीवनात सुख शांती आणि सौभाग्य आणू दे असं त्यांनी म्हटलं.

अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनीही अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांना आणि भारतातील नागरिकांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी ट्विट करू म्हटलं की, होळीच्या शुभेच्छा, होळीला रंगांसाठी ओळखलं जातं. आपल्या मित्रांसह जवळच्या लोकांना रंग लावला जातो. आनंदाने भरलेला होळीचा सण सकारात्मकता घेऊन येऊदे. तसंच आपआपसातील मतभेद दुर करून एकत्र आणणारा आहे असा संदेशही कमला हॅऱिस यांनी दिला. 

कोरोनाचा ससंर्ग वाढत असल्यानं सणांमध्ये आता प्रशासनाची चिंता वाढवली आहे. सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यावर दिल्लीत बंदी घालण्यात आली असून उत्तर प्रदेशातही कार्यक्रम आयोजित करण्यासाठी परवानगी आवश्यक आहे. महाराष्ट्र सरकारने होळीला कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई करणार असल्याचं सांगितलं आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: ३० मेपासून तळपत्या उन्हात आमरण उपोषण, जीव गेला तर फडणवीस जबाबदार... मनोज जरांगे यांची कठोर भूमिका!

Washim Accident: आनंदाचा क्षण काळ ठरला! धोंड्याच्या जेवणावरून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला, अपघातात दोन चिमुकल्यांसह वडिलांचा मृत्यू..

Asian Relay India Host: भारताला मिळाली सर्वात मोठी गूड न्यूज! आशियाई स्पर्धांचे यजमानपद बहाल; पण सामने 'या' दोन शहरांत का होणार?

वैभव सूर्यवंशी अचानक पळत आला अन् गावसकर-बांगर यांच्यासमोर झाला नतमस्तक; SRH vs RR सामन्याआधीचा Video Viral

IND vs ENG: म्हणून हरमनप्रीत कौरसाठी आजची मॅच ठरणार 'अग्निपरीक्षा'; विश्वकरंडकापूर्वी टीम इंडियासमोर मोठं आव्हान!

SCROLL FOR NEXT