Holi 2023 esakal
देश

Holi 2023 : यंदा होळी नेमकी किती तारखेला ? होलिका दहन सोमवारी की मंगळवारी? वाचा मुहूर्त

यंदाची नेमकी होळी कधी सेलिब्रेट करायची ते जाणून घ्या

सकाळ ऑनलाईन टीम

Holi 2023 : यंदा होळी नेमकी किती तारखेला आहे यावरून संभ्रम निर्माण झालेला दिसून येतो. या मागचं कारण असं की, यंदा उत्तर पश्चिम भारत आणि पूर्व भारतात दोन वेगवेगळ्या दिवशी होळी साजरी केली जाऊ शकतेय. भारतात होळी हा लोकप्रिय सण आहे. आदल्या दिवशी होळीत सारं काही जाळून टाकायचं नंतर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा. मात्र यंदाची नेमकी होळी कधी सेलिब्रेट करायची ते जाणून घ्या.

होळीच्या सणासाठी प्रदोष काल महत्वाचा असल्याने सोमवारी हुताशिनी पौर्णिमेला होलिका दहन करावे, असे पंचांगकर्ते दाते मोहन यांनी सांगितले आहे. तर सोमवारी भद्रेवर पौर्णिमा येत असल्याने भद्रेचा कालावधी संपल्यानंतर मंगळवारी नागरिकांना होलिका दहन करावे असे आवाहन पुण्यातील पंचांगकर्ते व खगोलशास्त्राचे अभ्यासक गौरव देशपांडे यांनी केले आहे.

मोहन दाते म्हणाले, की या वर्षी सोमवारी दुपारी ४ वाजून १७ मिनिटांनी चतुर्दशी समाप्ती होत असून त्यानंतर पौर्णिमा सुरु होत आहे. पौर्णिमेसाठी प्रदोष काळ महत्वाचा आहे. महाराष्ट्र, कर्नाटक,तमिळनाडू, आंध्र प्रदेश, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, दिल्ली येथे सोमवारी सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनंतर सूर्यास्त होत असल्याने या राज्यांमध्ये सोमवारीच होलिका दहन करावे. (Astrology)

तर उत्तर प्रदेश, बिहार, ओडिसा, आसाम, मेघालय या राज्यांमध्ये पौर्णिमा समाप्तीपूर्वी म्हणजे मंगळवारी होलिका दहन करावे. गौरव देशपांडे म्हणालेत की होलिका दहन योग्य दिवशी व्हावे यासाठी नागरिकांनी सोमवारी नव्हे तर मंगळवारी होलिका दहन करावे. ६ मार्च रोजी तिथीचा अर्धा भाग असलेला करण आणि त्याचा एक भाग असलेला भद्रा येत आहे.भद्रा ही दर पौर्णिमेला येते. मात्र, पुराणात रक्षाबंधन आणि होलिका दहन या दोन पौर्णिमा भद्रेवर साजऱ्या करू नयेत, असे सांगण्यात आले आहे. हे लक्षात घेता भद्रेचा कालावधी संपल्यानंतर नागरिकांनी ७ मार्च रोजी होलिका दहन करावे. (Holi)

पौर्णिमा तिथी प्रारंभ - ६ मार्च सोमवार, दुपारी ४.१८ पासून

पौर्णिमा तिथीची पूर्णता - ७ मार्च मंगळवार, संध्याकाळी ६.१० पर्यंत

भद्राकाळाची सुरुवात - ६ मार्च, सोमवार, दुपारी ४.४८ पासून

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राला मिळणार १२ नवे IPS अधिकारी; पाच महिला अधिकाऱ्यांचा समावेश, ३१ ऑगस्टपासून सांभाळणार जबाबदारी, वाचा यादी

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

"मी फक्त 50 रुपयांत केस कापतो"; कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचं विधान; संपत्तीबाबत भाजपचा खुलासा

Electric Short Circuit: राजुरीत शॉर्टसर्किटमुळे दिड एकर ऊस जळून खाक; शेतकरी हाडवळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान, महावितरणकडून भरपाईची मागणी

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

SCROLL FOR NEXT