Indore Crime News
Indore Crime News esakal
देश

मोबाईल चार्जरच्या केबलनं पतीनं पत्नीचा गळा आवळून केला खून

सकाळ डिजिटल टीम

इंदौरच्या द्वारकापुरी भागात एक हृदयद्रावक घटना समोर आलीय.

इंदौरमध्ये (Indore) मंगळवारी रंगपंचमी (Holi Festival) साजरी होत असतानाच दुसरीकडं इंदौरच्या द्वारकापुरी भागात एक हृदयद्रावक घटना समोर आलीय. इथं एका कंत्राटदारानं आधी आपल्या पत्नीचा मोबाईल चार्जरच्या केबलनं (Mobile Charger Cable) गळा आवळून खून केला आणि नंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केलीय.

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, रंगपंचमीच्या दिवशी मुलं घराबाहेर पडताच कंत्राटदारानं हे पाऊल उचललंय. पतीला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता, यावरून दोघांमध्ये बराच काळ वाद सुरू होता. दरम्यान, पोलिसांना घटनास्थळावर एक सुसाईड नोटही सापडलीय. यात ‘मी माझ्या पत्नीची हत्या करून आत्महत्या करत आहे’, असं लिहिलंय.

रणजित हा बांधकाम कंत्राटदार होता. रणजीतनं स्वतःची पत्नी संतोषीबाईचा चार्जर केबलनं गळा आवळून खून केला आणि नंतर स्वत: गळफास लावून घेतलाय. या घटनेदरम्यान सौरभ (वय 14) आणि मुलगी निधी (वय 10) ही मुलं रंगपंचमीच्या दिवशी घराबाहेर होळी खेळत होती. दरम्यान, मुलांनी घरात येऊन पाहिल्यानंतर त्यांनी आजूबाजूच्या लोकांना ही माहिती दिली. घटनास्थळावरून पोलिसांनी एक सुसाईड नोटही जप्त केलीय. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"होय, स्वाती मालिवाल यांच्याशी गैरवर्तन झाले, केजरीवाल कारवाई करतील," 'आप'ने स्वीकारले आरोप

KL Rahul: जो बुंद से गई वो... प्रेक्षकांसमोर झापल्यानंतर राहुलबरोबर संजीव गोयंकांचे डिनर कोणालाच पचेना

CM Shinde: मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या 'या' निर्णयाचा ठाणे-पालघरमध्ये होणार महायुतीला फायदा!

Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार खरेदी; सेन्सेक्स 340 अंकांनी वधारला, कोणते शेअर्स तेजीत?

Marathi News Live Update: महायुतीच्या प्रचारासाठी PM मोदींचा उद्या मुंबईत मोठा 'रोड शो'

SCROLL FOR NEXT