Viral Video
Viral Video esakal
देश

Viral Video : तोंडाल रंग लावला म्हणून पिचकारीत भरलं नाल्याचं पाणी अन्...

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर रोज काही ना काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत राहतात. त्या फोटो आणि व्हिडिओवर अनेकजण लाइक्स, कमेंट्सही करतात. असाच एक रंगपंचमीचा व्हिडिओ व्हायरल होतोय. 18 मार्च रोजी होळीचा (रंगपंचमी) सण देशभरात मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. होळी (Holi) हा असा सण आहे ज्याची लोक वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात. या दिवशी लोक एकमेकांसोबत रंग भरपूर खेळून खूप धमाल करतात. या सणाच्या दिवशी मुलं खूप मस्ती ही करतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये मुलं खूप मस्ती करताना दिसताहेत. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही आनंद होईल. तुम्हाला तुमच्या बालपणीचे दिवसही आठवतील. या व्हिडीओमध्ये एका मुलाच्या चेहऱ्यावर त्याच्या मित्रांकडून भरपूर रंग लावण्यात आला. त्यानंतर त्याचा बदला घेण्यासाठी तो असं काही करतो, ज्यामुळे तुम्हाला हसू येईल.

व्हिडिओमध्ये, एका मुलाच्या हातातील रंग दुसऱ्या मुलाने हिसकावून घेतला होता आणि त्याच्या मित्रांनी त्याच्याच चेहऱ्यावर तो रंग लावला. यानंतर त्या मुलाने बदला घेण्यासाठी आपल्या पिचकारीत नाल्याचे पाणी भरले आणि ते त्या मित्रांच्या अंगावर पिचकारीने ओतायला सुरुवात केली. स्वत:चा रंग स्वतःच्या तोंडावर लावल्यानंतर मुलाला खूप राग येतो.

हे पाहून लोक हैराण झाले.

मुलाचं हे कृत्य पाहून तिथे उपस्थित असलेल्या लोकांना धक्काच बसला आहे. सोशल मीडिया यूजर्सनाही हा व्हिडिओ पाहून मजा येत आहे. काही युजर्स म्हणतात, "मुलाने बदला घेण्यासाठी असं केलेलं असेल," दुसऱ्याने सांगितले की, ही खरोखरच नेक्स्ट लेव्हल होळी होती. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय आणि या व्हिडिओला भरपूर लाइक्स मिळताहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तुम्ही दहा वर्षांत काय केले हे पाहा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला

ED : ‘ईडी’वर अंकुश! न्यायप्रविष्ट प्रकरणांत आता थेट अटक होणार नाही

Loksabha Election 2024 : मुंबईत आज ‘महासंग्राम’; सांगता सभांमुळे राजकीय तापले वातावरण

Sugar : केंद्र सरकारच्या बंदीमुळे साखर होणार ‘तिखट’; ९० लाख टन साखर अतिरिक्त ठरण्याची शक्यता

अग्रलेख : ‘आप’ भी...?

SCROLL FOR NEXT