Amritpal Singh
Amritpal Singh Sakal
देश

Amritpal Singh : ८० हजार पोलिसांना फसवून 'तो' पळालाच कसा? उत्तर आहे ७ वेश बदलून....

सकाळ डिजिटल टीम

Amritpal Singh News : अमृतपाल सिंग हे नाव सध्या देशातच नव्हे तर परदेशातही चर्चेत आलं आहे. खलिस्तानी संघटनेच्या या म्होरक्याला सध्या फरार घोषित केलं असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. दरम्यान, त्याच्या पलायनाबद्दल धक्कादायक माहिती समोर येत आहे.

पंजाब सरकार सध्या अमृतपाल सिंगच्या मागावर आहे. ८० हजारांचा पोलीस फौजफाटा असताना असूनही तो तुमच्या हातातून कसा काय निसटला, असा प्रश्न पटियाला उच्च न्यायालयाने पंजाब सरकारला विचारला आहे. त्याच्या पेहरावामुळे तो निसटल्याचं आता समोर आलं आहे.

पोलिसांच्या हातावर तुरी देण्यासाठी अमृतपाल सिंग वेगवेगळे वेश धारण करत असल्याचं पंजाब पोलिसांनी सांगितलं आहे. त्याचा असाच एक वेगळा वेश धारण करुन पळून जातानाच एक व्हिडीओ व्हायरलही होत आहे. त्याच्या नातेवाईकांकडून मात्र त्याला अटक झाल्याचा दावा करण्यात येत आहे.

पंजाब पोलिसांनी अमृतपाल सिंग याचे वेगवेगळ्या लूकमधले फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत तो खूपच स्टायलिश दिसत आहे. तर एका फोटोमध्ये त्याने पगडी घातलेली, दाढी कोरलेली असा लूक केला आहे. एका फोटोमध्ये तो एकदम अस्ताव्यस्त दिसत आहे. तर एका फोटोत पूर्णपणे क्लिन शेव करून एकदम मॉडर्न लूकमध्ये दिसत आहे. त्याच्या सातत्याने लूक बदलण्यामुळे त्याचा ठावठिकाणा शोधणं पोलिसांना अवघड जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरे एकाच मंचावर; 17 मे रोजी सभा

KL Rahul: 'हा काय वनडे-टी20 खेळणार, त्याच्याकडे स्ट्रेंथच नाही...', केएल राहुलने सांगितली ती आठवण

Covishield : सीरमने २०२१ मध्येच थांबवले कोव्हिशिल्डचे उत्पादन

Gargai Dam Project : गारगाई प्रकल्पाला येणार वेग; मुंबईला मिळणार ४०० दशलक्ष लिटर पाणी

PSL vs IPL : पाकिस्तान करणार धरमशालाची कॉपी; PSL ला IPL सारखी झळाळी देण्यासाठी सुरू केली धडपड

SCROLL FOR NEXT