Mohan Yadav 
देश

Mohan Yadav: "मोहनजी उभे राहा"; भाजपनं मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदासाठी अशी केली निवड

मध्य प्रदेशात शिवराज सिंह चौहान यांची कारकीर्द आता संपली असून यादव पर्व सुरु झालं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

भोपाळ : मध्य प्रदेशात शिवराज सिंह चौहान यांची कारकीर्द आता संपली असून यादव काळ सुरु झाला आहे. अर्थात मोहन यादव हे राज्याचे नवे मुख्यमंत्री निवडले गेले आहेत. भाजपनं सोमवारी या नावाची घोषणा केली. हे समोर येताच भाजपच्या अनेक बड्या नेत्यांच्या भुवया उंचावल्या गेल्या. पण मोहन यादव यांची निवड नेमकी कशी झाली जाणून घेऊयात. (How BJP chose Mohan Yadav for the post of Chief Minister of Madhya Pradesh)

मोहनजी उभे तर राहा

मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री निवडीसाठी विधीमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी मोहन यादव यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर खट्टर यांनी शिवराज सिंह चौहान यांचा उत्तराधिकारी म्हणून मोहन यादव यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. या बैठकीत मोहन यादव हे शेवटच्या रांगेत बसलेले होते. त्यानंतर शिवराज सिंह चौहान यांनी त्यांच्याकडं बघून म्हटलं, "अरे मोहन जी खडे तो हो जाईए". (Latest Marathi News)

दोन उपमुख्यमंत्री

यानंतर खट्टर यांच्या प्रस्तावाला अर्थात मोहन यादव यांच्या नावाच्या प्रस्तावाला नरेंद्र सिंह तोमर आणि कैलाश विजयवर्गीय यांनी अनुमोदन दिलं. यावेळी राजेंद्र शुक्ला यांनी देखील या नेत्यांसह प्रस्तावाला पाठिंबा जाहीर केला. यानंतर राजेंद्र शुक्ला आणि जगदीश देवडा हे मोहन यादव यांचे उपमंत्री बनले अर्थात उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची नावं जाहीर झाली. तर केंद्रीय मंत्री असलेले नरेंद्र सिंह तोमर ज्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती ते विधानसभा अध्यक्ष बनले. (Marathi Tajya Batmya)

कट्टर हिंदुतत्वादी नेते

मोहन यादव हे ओबीसी नेते असून भाजपकडून यंदा तिसऱ्यांदा आमदार बनले आहेत. उज्जैन दक्षिण विधानसभा मतदारसंघातून ते तिन्ही वेळेस निवडून आले आहेत. मागच्या शिवराजसिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी शिक्षण मंत्री म्हणून काम केलं आहे. ५८ वर्षीय मोहन यादव हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जवळचे अन् कट्टर हिंदुत्वावादी नेते मानले जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT