General Knowledge esakal
देश

General Knowledge : ट्रेन ड्रायव्हरला कसा काय कळतो पुढचा रूट, नेमकी कुठली टेक्नॉलॉजी वापरतात?

रेल्वेमध्ये कुठली टेक्नॉलॉजी वापरली जाते, जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

General Knowledge : तुम्ही कधीतरी रेल्वेचा प्रवास नक्कीच केला असेल. रेल्वेचा प्रवास करताना मात्र हा विचार कधी तुमच्या मनात आलाय का की रेल्वेच्या ड्रायव्हरला पुढचा रस्ता कसा कळतो? बसप्रमाणे त्याला सरकट पुढचे दिसत नाही. मग यामध्ये नेमकी कुठली टेक्नॉलॉजी वापरतात? कधीतरी अनेकांना पडलेल्या या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत.

रेल्वे रूळाला नेव्हिगेट करण्यासाठी ट्रेन ड्रायव्हर सिग्नल, ट्रॅक, स्विच आणि शेड्युलच्या काँम्बिनेशनचा वापर करतात. रूळावर धावताना ट्रेनला ट्रेनच्या पुढल्या रस्त्याबाबत संकेत दिले जातात.

General Knowledge

गरज पडल्यास पायलटला ट्रॅक स्विच करण्याची परवानगी देण्यात येते. याव्यतिरिक्त ट्रेन ड्रायव्हर एका शेड्युलचं पालन करतात ज्यात ट्रेन कुठल्या रूळाने न्यायची आहे आणि कुठल्या स्टॉपवर थांबायचं आहे याबाबत सगळं सांगितलेलं असतं.

रेल्वेबाबत सगळ्या सूचना रेल्वे कंट्रोल रूममधून सुनिश्चित केल्या जातात.

ट्रेन ड्रायव्हर ट्रेन कंट्रोल कशी करतात?

लोको पायलटला ट्रेन चालवताना कसं आणि कुठे जायचं आहे, याबाबतची माहिती होम सिग्नलद्वारे दिली जाते. ट्रेनचा वेग नियंत्रित करणे आणि नियोजित थांबे तयार करणे ही त्याची जबाबदारी आहे. (Technology)

General Knowledge

आधी रेल्वे ट्रॅक कशी बदलली जायची?

यापूर्वी, ट्रॅकच्या प्रत्येक विभागात तैनात असलेल्या केबिन बॉयद्वारे रेल्वे ट्रॅक बदलण्याचे काम हाताने केले जात होते. पण आता आधुनिक इलेक्ट्रॉनिक्समुळे ही प्रक्रिया स्वयंचलित आणि कार्यक्षम झाली आहे.

अनेकांना रेल्वेच्या या नियंत्रणाबाबत आणि त्यात वापरल्या जाणाऱ्या टेक्नॉलॉजीबाबत माहिती नसतं. तेव्हा ही माहिती प्रत्येकासाठीच फार फायद्याची ठरते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बंगळुरुतून जगभरात वाढवतायत 'ओळख मायबोलीची', देशविदेशातील हजारो विद्यार्थी शिकत आहेत मराठी

Rinku Singh Father Passed Away : क्रिकेटपटू रिंकू सिंगच्या वडिलांचे निधन, कर्करोगाशी झुंज अपयशी, नोएडातील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

आजचे राशिभविष्य - 27 फेब्रुवारी 2026

Paneer Fried Rice Recipe: उरलेला भात फेकू नका! फक्त 15 मिनिटांत बनवा रेस्टॉरंट-स्टाइल पनीर फ्राइड राइस

Panchang 27 February 2026: आजच्या दिवशी देवी कवच स्तोत्राचे पठण आणि ‘शुं शुक्राय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT