Covaxin Sakal
देश

कोव्हॅक्सिन लस डेल्टाविरुद्ध किती प्रभावी? भारत बायोटेकनं केलं स्पष्ट

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली- कोव्हॅक्सिन लस कोरोना विषाणूविरूद्ध लढण्यासाठी ७८ टक्के प्रभावी ठरते व घातक अशा डेल्टा व्हेरियंटच्या विरुद्ध ती ६५.२ टक्के प्रभावी ठरते असे तिसऱ्या व अंतिम चाचणीतून आढळले आहे, असे भारत बायोटेक कंपनीने म्हटले आहे. (How effective is covacin vaccine against delta answer Bharat Biotech)

कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्याच्या चाचण्यांचे अधिकृत निष्कर्ष भारत बायोटेकने जारी केले. जानेवारीत कोव्हॅक्सिनच्या तीन चाचण्या होण्यापूर्वीच केंद्राने या लसीच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली होती. त्यानंतर भारत बायोटेकने नुकत्याच तिसऱ्या टप्प्याच्या चाचण्या पूर्ण केल्या आहेत. देशातील २५ केंद्रांवर १८ ते ९८ वयोगटातील २५ हजार ८०० जणांवर लसीच्या या चाचण्या घेण्यात आल्या. यात सहभागी स्वयंसेवकांना लसीचे दोन्ही डोस दिल्यावर दोन आठवडे डॉक्टरांनी त्यांच्या आरोग्यावर देखरेख ठेवली. त्या निष्कर्षानुसार कोव्हॅक्सिन लस गंभीर संक्रमणाविरूध्द तब्बल ९३.४ टक्के प्रभावी ठरते असे चाचण्यांत आढळल्याचे त्यांनी म्हटले आहे. कोरोना रुग्णांवर विषाणूचा दुष्प्रभाव रोखण्यासाठी ती ७७.८ टक्के व लक्षणे न आढळणाऱ्या रुग्णांसाठी ती ६३ टक्के प्रभावी ठरते. केंद्र सरकारने यंदा जानेवारीत कोव्हॅक्सिनच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली होती. मात्र तिन्ही चाचण्या पूर्ण न होताच लसीला परवानगी दिल्याबद्दल सरकारवर टीकाही झाली होती.दिल्लीतील अनेक डॉक्टरांनीही ही लस टोचून घेण्यास नकार दिला होता. अनेक राज्यांनीही या लसीबाबत नकारार्थी सूर लावला होता. ही लस मेड इन इंडिया कोविड-१९ लस म्हणून ओळखली जाते.

लसीकरण किती जणांचे

(आरोग्य मंत्रालयाची ३ जुलैपर्यंत )

देशभरात - ३४ कोटी ७६ लाख २३२

पहिला डोस घेतलेले: २७ कोटी ९४ लाख ५४ हजार ०९१

दोन्ही डोस घेतलेले : ६ कोटी ६ लाख २२ हजार १४१

४५ ते ५९ वयोगट

पहिला डोस घेतलेले: ८ कोटी ९२ लाख ४६ हजार ९३४

दुसरा डोस घेतलेले : १ कोटी ६८ लाख ५५ हजार ६७६

६० वर्षांपुढील

- पहिला डोस घेतलेले : ६ कोटी ८३ लाख ५५ हजार ८८७

- दुसरा डोस घेतलेले : २ कोटी ४६ लाख ७० हजार ५७६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT