rajesh tope...gives info maha task force decision sakal
देश

निर्बंध चांगल्या स्पिरीटने घ्यावेत; आरोग्यमंत्र्यांनी दिली कोरोनाची इत्यंभूत माहिती

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: राज्यातील कोरोना परिस्थितीची माहिती देण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषद घेतली आहे. आज केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांच्याबरोबर आता साडेतीन ते साडेपाच वाजेपर्यंत जवळजवळ दोन तास पाच राज्यांचा आढावा घेणारी बैठक झाली. त्यामध्ये त्यांनी काही प्रेझेन्टेशन दिलं. त्यामाध्यमातून त्यांनी काय अपेक्षित आहे, याची मांडणी केली आहे. त्या बैठकीनंतर राज्याची परिस्थिती काय आहे, याची त्यांनी माहिती दिली आहे. शाळा बंद करण्याच्या निर्णय असो वा हे लादलेले निर्णय असोत, हे विचारपूर्वकच घेतले आहेत, लादलेले निर्बंध चांगल्या स्पिरीटने घ्या, अशी विनंती त्यांनी केली आहे.

राजेश टोपे यांनी राज्याच्या कोरोना परिस्थितीची माहिती देताना म्हटलंय की, सध्या महाराष्ट्रातील ऍक्टीव्ह केसेस आजच्या एक लाख 73 हजार आहेत. यामधील आयसीयूमध्ये 1711 रुग्ण आहेत. हे एकूण पॉजिटीव्ह रुग्णसंख्येच्या एक टक्काच आहेत. थोडक्यात, आयसीयू बेडवरचे एक आणि ऑक्सिजन बेडवरचे 2 टक्के असे तीन टक्के रुग्णच गंभीर अवस्थेत आहेत. राज्यातील 13 टक्के रुग्ण माईल्ड स्थितीमधले आहेत. राज्यात कुठेही मोठ्या प्रमाणावर मृत्यू होण्याची परिस्थिती नाही. हे सांगण्यामागचं कारण असं की, राज्यात 38850 आयसीयू बेड्स आहेत. यापैकी 1710 सध्या ऍडमिट आहेत. त्यामुळे बेड्सची एकूण उपलब्धता आणि त्यातुलनेत सध्याचे रुग्ण कमी आहेत. व्हेंटीलेटरच्या 16 हजारच्या बेड्सपैकी 3 ते 4 टक्केच रुग्ण सध्या आहेत. राज्यातील 85 टक्के रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीयेत. राज्यातील 89 टक्के लोकांचा पहिला डोस पूर्ण झाला आहे तर 60 टक्के लोकांचा दूसरा डोसही पूर्ण झाला आहे. लसीकरण जास्त झालेल्या जिल्ह्यामध्ये हॉस्पिटलायझेशन अत्यंत कमी आहे, त्यामुळे लसीकरणावरच अधिक भर देण्यात येणार आहे.

पुढे त्यांनी म्हटलंय की, हे प्रमाण निश्चित प्रकारे कमी असून सध्या यंत्रणेवर ताण नाहीये. हे मंत्र्यांना दाखवून दिलं आहे. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सूचना केल्या आहेत की, टेस्टींग वाढवा. नियमावली पाळा आणि लसीकरण वाढवा, हेच त्यांचं म्हणणं होतं. कलेक्टर्सनी आयसोलेशन किट्स तयार केले पाहिजेत. 20 मीलीचे सॅनिटायझर 10 मास्क, 10 पॅरिसिटीमॉल असं कीट तयार करण्यासंदर्भात होम आयसोलेशन किट्स तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. होम क्वारांटाईनमध्ये असलेल्यांना कॉल सेंटरवरुन तीन कॉल जातील, अशी तयारी करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT