ration card google
देश

रेशनकार्डशिवाय मिळणार रेशन; कसे ते पाहा

तुम्ही कुठेही राहात असाल तरीही, तुम्हाला फक्त सरकारी दुकानात जाऊन रेशनकार्ड क्रमांक आणि आधार क्रमांक सांगावा लागेल आणि तुम्हाला रेशन मिळेल.

नमिता धुरी

मुंबई : सरकार अनेक दिवसांपासून सर्वसामान्यांना मोफत रेशन देत आहे. म्हणजेच जेवढे शिधापत्रिकाधारक आहेत, त्यांना सातत्याने मोफत रेशनची सुविधा मिळत गेली. साहजिकच गरीब वर्गाला याचा खूप फायदा झाला. त्याचबरोबर आता सरकार अशा सुविधेवर काम करत आहे, ज्यामध्ये तुम्ही रेशनकार्डशिवाय रेशन घेऊ शकाल. ही सुविधा प्रथम उत्तर प्रदेश आणि नंतर इतर राज्यांमध्ये सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.

रेशन कार्ड आणि आधार क्रमांक उपयुक्त ठरेल

सरकारने देशात 'वन नेशन, वन रेशन कार्ड'ची सुविधा सुरू केली आहे. आता या सुविधेत ७७ कोटी लोक जोडले गेले आहेत. तुम्ही कुठेही राहात असाल तरीही, तुम्हाला फक्त सरकारी दुकानात जाऊन रेशनकार्ड क्रमांक आणि आधार क्रमांक सांगावा लागेल आणि तुम्हाला रेशन मिळेल.

याबाबत बोलताना पीयूष गोयल म्हणाले की, ७७ कोटी लोकांपैकी एकूण ९६.८ टक्के शिधापत्रिका वापरणाऱ्यांची संख्या आहे, ज्यामध्ये केंद्रशासित प्रदेशांसह ३५ राज्यांतील लोकांचा समावेश आहे. सोबतच त्यांनी सांगितले की, कोणीही व्यक्ती इतर कोणत्याही शहरात किंवा राज्यात नोकरीसाठी गेल्यास रेशनकार्ड क्रमांक आणि आधार कार्डची माहिती देऊन रेशन घेऊ शकतो. तसेच त्याला मूळ शिधापत्रिका दाखवण्याची गरज भासणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT