Himachal Pradesh Assembly Election Results 2022 esakal
देश

Himachal Election Results : हिमाचल 'त्रिशंकू' झालं तर काय, कोणाचं सरकार स्थापन होणार?

हिमाचल प्रदेशातील 68 विधानसभा जागांसाठी मतमोजणी सुरू झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

हिमाचल प्रदेशातील 68 विधानसभा जागांसाठी मतमोजणी सुरू झाली आहे. पोस्टल बॅलेटच्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये निकराची लढत पहायला मिळत आहे. भाजप 34 जागांवर आघाडीवर असून काँग्रेसला 31 जागांवर आघाडी मिळाली आहे. त्याचवेळी तीन जागांवर अपक्ष आघाडीवर आहेत.

'आप'ला अद्याप खातं उघडता आलेलं नाही. राज्यात 37 वर्षांची परंपरा कायम राहणार की नवा इतिहास रचणार, हे आज दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे. हिमाचलमध्ये 12 नोव्हेंबरला मतदान झालं. या निकालावरुन त्रिशंकू स्थिती राहणार की, अपक्ष उमेदवार 'किंगमेकर' ठरणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 1985 नंतर राज्यात कोणत्याही पक्षाचं सरकार पुनरावृत्ती करू शकलेलं नाही. त्यानंतर काँग्रेसचं सरकार होतं आणि वीरभद्र सिंह मुख्यमंत्री होते.

  • सध्या हमीरपूर या जागेवरून अपक्ष उमेदवार आघाडीवर आहे.

  • भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या जिल्ह्यात भाजप चारपैकी दोन जागांवर तर काँग्रेस दोन जागांवर आघाडीवर आहे.

  • हिमाचलमध्ये सकाळी 9.25 पर्यंत मतांची टक्केवारी : काँग्रेस-44.7%, भाजप-40.8% आणि इतर-12.1%.

  • सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजपला बहुमत मिळाल्यानंतर हिमाचल भाजपचे अध्यक्ष सुरेश कश्यप राज्य पक्ष कार्यालयात पोहोचले आहेत.

हिमाचल प्रदेशात प्रत्येक वेळी 45 ते 75 टक्के मंत्री निवडणूक हरण्याचा ट्रेंडही आहे. यावेळीही जयराम ठाकूर यांच्या 11 पैकी 7 मंत्र्यांचा पराभव निश्चित मानला जात आहे. दोन मंत्र्यांच्या जागाही बदलण्यात आल्या. त्यामध्ये नगरविकास मंत्री सुरेश भारद्वाज यांना शिमला शहर आणि कांगडा जिल्ह्यातील नूरपूर जागी वनमंत्री राकेश पठानिया यांना फतेहपूरमधून उमेदवारी देण्यात आली.

गेल्या चार निवडणुकांचा रेकॉर्ड पाहिला तर प्रत्येक वेळी जवळपास निम्मे किंवा त्याहून अधिक मंत्री निवडणुकीत पराभूत झाले आहेत. 2017 च्या निवडणुकीत काँग्रेसचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह मंत्रिमंडळातील 11 पैकी 5 मंत्री निवडणुकीत पराभूत झाले. 2012 मध्ये भाजप सरकारमधील मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल यांच्या 10 पैकी 4 मंत्री निवडणुकीत पराभूत झाले. 2007 मध्ये वीरभद्र सिंह यांनी एक वर्ष लवकर विधानसभा निवडणुका घेतल्या. परंतु, त्यांच्या मंत्रिमंडळातील 10 पैकी 6 मंत्र्यांनी आपली जागा गमावली. त्याचप्रमाणे 2003 मध्ये भाजपचे मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल यांच्या मंत्रिमंडळातील 11 पैकी 6 मंत्री जिंकू शकले नव्हते. 2017 च्या निवडणुकीत भाजपनं 68 पैकी 44 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवलं. परंतु, स्वतःचे मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल यांचा पराभव झाला. हमीरपूर जिल्ह्यातील सुजानपूर मतदारसंघात धुमल यांचा त्यांच्याच राजेंद्रसिंह राणा यांनी 1 हजार 919 मतांनी पराभव केला. निवडणुकीपूर्वी भाजप सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या राणा यांची ही पहिलीच विधानसभा निवडणूक होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT