Narendra Modi esakal
देश

मी काहीच ऐकणार नाही, निवडणुकीतून माघार घ्या; PM मोदींनी स्वत: फोन करुन बंडखोराला झापलं!

निवडणुकीच्या विजयासाठी भाजप-काँग्रेससह सर्वच पक्षांनी आपली ताकद पणाला लावलीय.

सकाळ डिजिटल टीम

निवडणुकीच्या विजयासाठी भाजप-काँग्रेससह सर्वच पक्षांनी आपली ताकद पणाला लावलीय.

Himachal Pradesh Assembly Election : हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या विजयासाठी भाजप-काँग्रेससह सर्वच पक्षांनी आपली ताकद पणाला लावलीय. मात्र, बंडखोर उमेदवार पक्षासाठी मोठी अडचण ठरत आहेत. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनीच भाजपच्या (BJP) बंडखोर उमेदवाराला फोन करून निवडणूक लढवू नका, असं सांगितल्याचा दावा केला जात आहे.

प्रत्यक्षात एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात फोनमधून येणारा मोदींचा आवाज ऐकू येत आहे. कांगडा जिल्ह्यातील फतेहपूर मतदारसंघातून भाजपचे कृपाल परमार यांना तिकीट न मिळाल्यामुळं ते अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहेत. त्यानंतर पीएम मोदींनी फोन करून त्यांना निवडणूक लढवू नका, असं सांगितलंय.

काँग्रेसनं (Congress) एक व्हिडिओ शेअर करून दावा केलाय की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बंडखोर नेत्याला स्वतः फोन करून निवडणूक लढवू नका, असं सांगितलंय. काँग्रेस नेत्या अलका लांबा (Alka Lamba) यांनी कृपाल परमार यांचा एक व्हिडिओ शेअर केलाय. भाजप सरकारवर टीका करताना त्या म्हणाल्या, 'हिमाचलमधील मुख्यमंत्री जयराम रमेश यांची खुर्ची आणि सरकार वाचवण्यासाठी पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्ट्र राज्यमंत्री, क्रीडामंत्री आणि मुख्यमंत्री सर्वजण कामाला लागले आहेत. त्यामुळं भाजपचा पराभव निश्चित आहे.'

काँग्रेस नेते श्रीनिवास यांनी म्हटलंय, तो दिवस आलाच! भारताचे पंतप्रधान हिमाचलमधील बंडखोर भाजप नेत्यांना फोन करत आहेत आणि निवडणुकीतून बाहेर पडा, असं सांगत आहेत. त्यांना आता पराभवाची भीती वाटू लागलीय. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये कृपाल परमार म्हणताहेत, "नमस्ते जी... मी कधी बोलू, माझं कोण ऐकणार..?" असं सांगत आहेत. समोरून एक व्यक्ती परमारांना निवडणुकीतून बाहेर पडा, असं सांगत आहे. कृपाल परमार हे पीएम मोदींशी बोलत असल्याचा दावा केला जात आहे. भाजपचे बंडखोर उमेदवार अपक्ष म्हणून उतरल्यावर पंतप्रधानांनी त्यांना निवडणुकीतून माघार घेण्यास सांगितलंय. त्यांच्या संभाषणाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. विरोधी पक्षांनी या व्हिडिओच्या माध्यमातून भाजपला जोरदार घेरलंय. मात्र, या व्हिडिओला अद्याप दुजोरा मिळालेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : विजय मेळाव्यासाठी जोशात निघाले शिवसैनिक आणि मनसैनिक, कोळी बँडच्या तालावर मुंबई थरारली!

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

D Gukesh: ज्या कार्लसनने 'कमजोर' म्हणून हिणवलं, त्याच्याच नाकावर टिच्चून गुकेशनं 'रॅपिड' स्पर्धेचं जेतेपद जिंकलं

Nagpur News: ऐकावं ते नवलच! मृत व्यक्तीला दिलं रहिवासी प्रमाणपत्र; वाडी नगरपरिषदेच्या कारभारावर गंभीर प्रश्न

SCROLL FOR NEXT