Aadhar Pan Linking esakal
देश

Aadhar Pan Linking: पॅन कार्ड अजूनही लिंक केलेलं नाही? लगेच करा नाहीतर... वाचा डेडलाइन अन् प्रोसेस

जाणून घ्या पॅन कार्ड आधार कर्डशी लिंक करण्याची शेवटची तारीख आणि प्रोसेस

साक्षी राऊत

Deadline For Pan Card: पॅन कार्डला आधार कार्डशी लिंक करण्यासाठी शासन वेळेवेळी गाइडलाइन आणि डेडलाइन जारी करत असते. मात्र अर्धे लोक याकडे दूर्लक्ष करतात. मात्र आता तुम्ही याकडे दूर्लक्ष केल्यास तुम्हाला तुमचं पॅन कार्ड गमवावं लागू शकते. तेव्हा जाणून घ्या पॅन कार्ड आधार कर्डशी लिंक करण्याची शेवटची तारीख आणि प्रोसेस.

CBDT (केंद्रिय प्रत्यक्ष कर बोर्ड) ने दिलेल्या निर्णयानुसार तुम्ही पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक न केल्यास तुम्हाला हजार रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. तसेच अशा पॅन कार्ड धारकांना केवळ वर्षाच्या शेवटपर्यंत ते कार्ड वापरण्याची मुदत दिली जाईल. त्यानंतर तुमचं पॅन कार्ड लिंक न केल्यास तुम्हाला ते गमवावं लागेल.

इनकम टॅक्स डिपार्टमेंटने ही डेडलाइन बरेचदा वाढवली आहे. आयकर विभागाने ३१ मार्च २०२२ पर्यंत लिंक करण्याचे आवाहन केले होते. मात्र तरीदेखील लाखो नागरिकांनी अजूनही त्यांचे कार्ड लिंक केलेले नाहीत. आता ही डेडलाइन वाढवत ३१ मार्च २०२३ करण्यात आलेली आहे. या तारखेपर्यंत लिंक न केल्यास तुमचं पॅन कार्ड निष्क्रिय करण्यात येईल.

पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करण्याची प्रोसेस

आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करा.

Quick Link सेक्शनवर जा आणि Link Aadhar वर क्लिक करा.

यात एक नवी विंडो ओपन होईल ज्यात तुम्हाला आधार कार्ड डिटेल्स आणि पॅन व मोबाइल नंबर रजिस्टर्ड करायचा आहे.

त्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड नंबरवर ओटीपी येईल.

ओटीपी दिलेल्या ठिकाणी भरा आणि 'Validate' वर क्लिक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Police: पुण्यात पोलिसांचा धाक उरलाय की नाही? मद्यपींकडून पोलिसांनाच धक्काबुक्की

Latest Marathi News Live Update : द्राक्षबागेची बिकट अवस्था पाहून उगाव येथील प्रगतिशील शेतकऱ्याची आत्महत्या

Air India Flight: दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात अचानक बिघाड; मंगोलियात इमर्जन्सी लँडिंग

Women's World Cup: पाकिस्तानची जर्सी घालून भारतीय संघाला वर्ल्ड कप जिंकण्यासाठी फुल सपोर्ट; चाहत्याचा Video Viral

Mumbai Airport: महत्त्वाची बातमी! मुंबई विमानतळाच्या दोन्ही धावपट्ट्या बंद राहणार; का अन् कधी? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT