husband books call girl whatsapp surprised see his wife 
देश

नवऱयाने बोलावलेली कॉल गर्ल निघाली त्याचीच पत्नी...

वृत्तसंस्था

डेहराडून (उत्तराखंड): एका नवऱयाने कॉल गर्ल हवी असल्याची मागणी केली होती. कॉल गर्ल म्हणून समोर पत्नीच आल्यामुळे दोघांमध्ये जोरदार हाणामारी झाली. पोलिसांपर्यंत प्रकरण गेले असून, या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, दिनेशपूर येथे राहणाऱया युवकाचा एक वर्षापूर्वी काशीपूर येथे राहणाऱया युवतीशी विवाह झाला होता. परंतु, विवाहानंतर दोघांचे भांडण होत होते. यामुळे भांडणाला कंटाळून पत्नी माहेरी निघून गेली होती. पत्नी आणि तिच्या मैत्रिणीमध्ये भांडण झाले होते. पत्नीच्या मैत्रिणीने युवकाला तुझी पत्नी कॉल गर्ल म्हणून काम करत असल्याचे सांगितले. शिवाय, दलाल महिलेचा मोबाईल क्रमांकही दिला. यानंतर पतीने दलाल महिलेशी कॉल गर्ल हवी म्हणून संपर्क साधला. यानंतर दलाल महिलेनं काही महिलांची छायाचित्रे व्हॉट्सऍपवरून पाठवली व यामधून एकीची निवड करण्यास सांगितले. पतीने आलेल्या फोटोंमधून पत्नीची निवड केली आणि दलाल महिलेला पत्ता पाठवला.

पतीने पाठविलेल्या पत्त्यावर कॉल गर्ल म्हणून एक महिला आली. पण, दोघे एकमेकांसमोर आलेल्यानंतर पती-पत्नी निघाले. दोघेही एकमेकांसमोर आल्यानंतर दोघांची पुन्हा भांडणे झाली. एकमेकांना मारहाण केली. यानंतर प्रकरण पोलिसांकडे गेले. पतीचे आपल्या मैत्रिणीशी संबंध असल्याचा आरोप पत्नीने केला. तर पत्नी कॉलगर्ल म्हणून काम करत असल्याचे पतीने पोलिसांना सांगितले. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"माझी फसवणूक झाली...", Prithvi Shaw च्या होणाऱ्या बायकोची 'ती' पोस्ट व्हायरल अन् ब्रेकअफच्या चर्चांना उधाण

Pune Rain News: पुण्यात मुसळधार पावसाचा तडाखा! कात्रजमध्ये सोसायटीची सीमाभिंत कोसळली; १८ वाहनांचे मोठे नुकसान

Marathi Live Updates : 12 तासांनंतर मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक सुरू

Pune Rain Red Alert: पुण्यात सलग चौथ्या दिवशी पावसाची रिपरिप; घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा ‘रेड’ अलर्ट

Pandharpur Air Ambulance: आषाढी वारीत वारकऱ्यांसाठी प्रथमच एअर ॲम्बुलन्स; पंढरपूरहून पुणे-मुंबईत तातडीने हलविण्याची सुविधा

SCROLL FOR NEXT