Crime 
देश

पत्नीला सरकारी नोकरी लागली म्हणून पतीने तिचा हातच तोडला

पत्नीला सरकारी नोकरी लागली तर ती आपल्याला सोडून जाईल अशी भिती पतीला होती.

दत्ता लवांडे

कोलकत्ता : सरकारी नोकरी मिळाली म्हणून एका युवकाने आपल्या पत्नीचा हात तोडल्याची घटना घडली आहे. रविवारी ही घटना पश्चिम बंगालमधील पूर्व बुर्धवान केटूग्राम येथे घडली आहे. तिला सरकारी नोकरी लागली होती.

(Crime News)

रेणू खटून असं या पिडीतेचं नाव असून तिला नुकतीच जिल्हा रूग्णालयात नर्सची नोकरी लागली होती. तीन वर्षाच्या अभ्यासानंतर तिला हे यश मिळालं होतं. तिचा पती आणि सासरचे मंडळी तिच्या सरकारी नोकरीसाठी विरोध करत होते. नोकरी करण्यावर ती ठाम होती त्यामुळे तिच्या पतीने तिचा उजवा हात तोडला.

पती मोहम्मद आणि तिचे सासरचे मंडळी या घटनेनंतर फरार आहेत. असं स्थानिक पोलिसांनी सांगितलं आहे. "मोहम्मदने आधी तिला उशीने आणि नंतर कोयत्याने तिच्या उजव्या हातावर हल्ला केला. त्या हल्ल्यात तिचा उजवा हात तुटला होता. त्यानंतर रेणू बेशुद्ध पडली तेव्हा मोहम्मदने तिचा हात घरात ठेवून हॉस्पिटलला नेले. जेव्हा तिला जाग आली तेव्हा तिने घडलेली घटना सांगितली." असं पोलिसांनी सांगितलं.

रेणूचे वडील अझिझूल हक् यांनी सांगितलं की, "माझी मुलगी लग्नाच्या नंतर एका खासगी रूग्णालयात काम करत होती. तिचे सासरचे तिच्या काम करण्यास विरोध करत होते. ती काम करता करता अभ्यास करत होती आणि काही दिवसांपूर्वी तिला सरकारी हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून नोकरी लागली आहे. त्यानंतर तिला सासरच्यांकडून सरकारी नोकरी करू नको असं सांगितलं जात होतं. तिला तिने केलेल्या कष्टाचं आणि तिच्या संघर्षाचं फळ असं मिळेल असं कधी वाटलं नव्हतं." असं रेणूचे वडील अझिझूल यांनी सांगितलं.

दरम्यान नोकरी करत असताना रेणूला सरकारी नोकरी लागली तर ती त्याला सोडून जाईल असं मोहम्मद ने त्याच्या मित्राला सांगितलं होतं असं पोलिसांच्या चौकशीतून समोर आलं आहे. सदर घटनेनंतर पोलिसांनी मोहम्मदच्या घरी धाव घेतली पण त्याच्या घराला कुलूप लावले होते. "ते फरार आहेत, आम्ही त्यांचा शोध घेत आहोत. त्यांच्या नातोवाईकांच्या घरी झाडाझडती घेतली पण तिथेही ते सापडले नाहीत." असं पोलिसांनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI MDR Update: UPI MDR शुल्काला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; काय म्हणाले कोर्ट?

विद्यापीठाने काही घडलंच नाही हे सांगायला लावलं, अत्याचार प्रकरणावरून विद्यार्थीनींचे प्रशासनावर गंभीर आरोप

'गारंबीचा बापू' आला रे! कोकणच्या मातीतील बंडखोर कहाणी आता मोठ्या पडद्यावर; 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

World Rabies Day 2026: कुत्रा चावला नाही तरी रेबीजचा धोका? 'हे' गैरसमज आजच दूर करा!

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात ठाणे काँग्रेस आक्रमक

SCROLL FOR NEXT