husband did not come home on karwa chauth wife hanged in lucknow (Photo Source: amarujala.com)
husband did not come home on karwa chauth wife hanged in lucknow (Photo Source: amarujala.com) 
देश

खूप वेळ वाट पाहिली अन् ठरवले...

वृत्तसंस्था

लखनौः खूप वेळ वाट पाहिली. वेळ पुढे-पुढे जात होती. अस्वस्थता वाढत होती. अखेर पंख्याला ओढणी बांधून गळफास घेण्याचा विचार केला. गळफास घेऊन आत्महत्या करणार तेवढ्या वेळात पोलिस आले अन् जीव वाचला.

करवाचौथला पतीला दीर्घायुष्य लाभावे म्हणून महिला उपवास करतात. संध्याकाळी चंद्र पाहिल्यानंतर उपवास सोडला जातो. इंदिरानंगर मधील सेक्टर 14 मध्ये राहात असलेल्या जान्हवी ऊर्फ नाजिया यांनी पतीची खूप वेळ पाहिली. पती न आल्यामुळे त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. जान्हवी गळफास घेत असल्याचे एका महिलेने खिडकीतून पाहिले व पोलिसांना कळवले. पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्यामुळे जान्हवी यांचा जीव वाचला आहे.

पोलिस निरीक्षक बृजेश कुमार सिंह यांनी सांगितले की, 'सीतापूर येथील रहिवासी असलेल्या नाजियाने सात वर्षांपूर्वी योगेंद्र जयस्वालसोबत आंतरजातीय प्रेमविवाह केला आहे. विवाहानंतर नाजियाने हिंदू धर्म स्वीकारल्यानंतर जान्हवी नाव लावले. करवाचौथनिमित्त जान्हवीने उपवास केला होता. संध्याकाळी दोघांमध्ये वाद झाल्यामुळे योगेंद्र घराबाहेर गेला होता. जान्हवीने योगेंद्रला खूप फोन व मेसेज केले. परंतु, उत्तर न दिल्यामुळे तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. शेजारी राहणाऱया महिलेने फासी घेत असल्याचे पाहिले व तत्काळ पोलिसांना फोन केला. पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले व जान्हवीचा जीव वाचवला. योगेंद्रचा शोध घेऊन रात्री साडेबारा वाजता त्याला घरी आणले.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT