HIV Couple Marriage esakal
देश

लग्नापूर्वी पतीने HIV असल्याचे लपवले, पत्नीला पॉझिटिव्ह बनवून झाला फरार

सकाळ वृत्तसेवा

Crime News: उत्तर प्रदेशमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेना आरोप केला आहे की पतीने लग्नापूर्वी एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे लपवले होते. त्यामुळे लग्नानंतर ती देखील एचआयव्ही पॉझिटिव्ह आली. सतत आजारी पडत असल्यामुळे सासरच्या  मंडळींनी महिलेला माहेरी सोडले, याप्रकरणी पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. मेरठच्या पल्लवपुरम पोलीस स्टेशन भागातील हे प्रकरण आहे. पती फरार असल्याची चर्चा आहे.

पीडितेच्या वडिलांनी तक्रारीत काय म्हटलं?

२०२१ मध्ये एका व्यक्तीने आपल्या मुलीशी लग्न केले होते. मुलीच्या लग्नासाठी मी १५ लाख रुपये खर्च केले. मात्र सासरचे लोक हुंड्यावर खूश नव्हते. ते सतत हुंड्याची मागणी करत होते. मुलगी हा सर्व त्रास सहन करत होती.

तसेच आरोपी व्यक्ती लग्नाआधीच एचआयव्ही पॉझिटिव्ह होता. पण लग्नावेळी त्याने हा आजार लपवून ठेवला होता. लग्नानंतर मुलगी देखील पॉझिटिव्ह आली. त्यामुळे तिला मारहाण करुन तिच्या माहेरी सोडले.  पीडितेच्या कुटुंबीयांनी तिच्यावर अनेक हॉस्पिटलमध्ये उपचार केले तेव्हा रक्त तपासणीत ती एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले, असे वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे.

सासरच्या लोकांनी मुलीला कालबाह्य झालेली औषधे दिली होती. हॉस्पीटलमध्ये असताना मुलीला नवरा एकदाही भेटायला आला नाही. मुलीच्या कुटुंबीयांनी गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्यानंतर तो हॉस्पीटलमध्ये आला होता. (latest marathi news)

याप्रकरणी पोलीस अधीक्षक पीयूष सिंह म्हणाले, गेल्या आठवड्यात पल्लवपुरम पोलिस ठाण्यात पती-पत्नीमधील वादाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यामध्ये अनेक आरोप आहेत, त्यापैकी एक म्हणजे तिचा पती आधीच एचआयव्ही पॉझिटिव्ह होता. लग्नाआधी त्याने हे लपवून ठेवले होते. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत असून योग्य कारवाई केली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: एकाच प्रकरणात वारंवार न्यायाधीशांची माघार; न्याय कोण देणार? CJI सूर्यकांत संतापले; हायकोर्टाला विचारला जाब

Shocking News : आईने डोळ्यादेखत पाहिला मुलाचा मृत्यू ! नॅशनल बॉडी बिल्डरचा धक्कादायक अंत, घराबाहेर पडताना खाली कोसळला अन्...

Infertility Causes: आई-बाबा होण्यात येतोय अडथळा? 'ही' ३ कारणं ठरू शकतात जबाबदार; तज्ज्ञांनी सांगितले प्रभावी उपाय

Pune News: पुणे महापालिकेत सत्ताधारी-विरोधक भिडले; पाणीटंचाईवर चर्चा अर्धवट, बोपोडी दर्ग्यावरील कारवाईच्या मुद्द्यावरून वाद !

Sindhudurg Crocodile Rescue : सिंधुदुर्गात विहिरीमध्ये आढळलं मगरीचं कुटुंब! 1 मादी अन् तब्बल 15 पिल्लांना बाहेर काढताना वनविभागाची तारांबळ, पुढं काय झालं?

SCROLL FOR NEXT