Spanish Travel Vlogger's Assault Case
Spanish Travel Vlogger's Assault Case Esakal
देश

Spanish Travel Vlogger's Assault Case: बलात्कार पीडित स्पॅनिश महिलेच्या पतीला 10 लाखांची भरपाई, पोलिसांच्या तत्परतेबाबत दाम्पत्याने मानले आभार

अंकिता खाणे (Ankita Khane)

Spanish Travel Vlogger's Assault Case: झारखंडमधील दुमका येथे सामूहिक बलात्कार झालेल्या स्पॅनिश महिलेच्या पतीला काल(सोमवारी) सरकारने नुकसान भरपाई दिली. दुमका येथील एका परदेशी महिलेच्या पतीला पोलीस उपायुक्तांनी नुकसान भरपाई म्हणून १० लाख रुपये सुपूर्द केले आहेत. पोलिसांनी तपास लवकर पूर्ण केल्याबद्दल पतीने त्यांचे आभार मानले आहेत.

लवकरच सुनावणी घेण्याचा प्रयत्न करू

उपायुक्त अंजनेयुलु दोड्डे यांनी सांगितले की, आम्ही या प्रकरणाचा तातडीने तपास केला. जिल्हा प्रशासनाच्या वतीने आम्ही त्यांना मदत करत आहोत. पीडित नुकसान भरपाई योजनेंतर्गत आम्ही त्यांना 10 लाख रुपये दिले आहेत. आरोपींना लवकरात लवकर आणि शिक्षा व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करू.

पीडितेने पोलिसांना सांगितली आपबिती

पीडितेने पोलिसांत दाखल केलेल्या एफआयआरमध्ये ही माहिती दिली आहे. पीडितेने एफआयआरमध्ये सांगितले की, तिला संध्याकाळी सात वाजता बाहेरून आवाज आला. त्यानंतर पती पत्नी दोघेही तंबूच्या बाहेर आले. त्यावेळी दोन जण त्यांच्याशी बोलत होते. काही वेळातच सात जण तिथे पोहोचले. पीडितेच्या म्हणण्यानुसार, त्यांनी तिच्या पतीसोबत भांडण सुरू केले आणि नंतर तंबूत घुसून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

आरोपींनी तिच्याकडून 300 डॉलर, 11 हजार रुपये आणि हिऱ्याची अंगठीही लुटल्याचे पीडितेने सांगितले. पीडितेचे म्हणणे आहे की, आरोपींपैकी एकाचे वय सुमारे 30 वर्षे आणि इतरांचे 20-22 वर्षांच्या आसपास होते. पीडितेने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, 'मला वाटले होते की ते मला मारतील, पण देवाच्या कृपेने मी आज जिवंत आहे.'

महिला आयोगाने या घटनेची घेतली दखल

या घटनेनंतर पीडितेने स्पेनमधील तिच्या मित्रांना या घटनेची माहिती दिली आणि सोशल मीडियावर पोस्टही शेअर केली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच गुन्हा दाखल करण्यात आला. दुमका पोलिसांनी रविवारी सायंकाळी सांगितले की, तीन आरोपींना अटक करण्यात आली असून चार आरोपी अद्याप फरार आहेत. राष्ट्रीय महिला आयोगानेही सामूहिक बलात्कार प्रकरणाची दखल घेतली असून झारखंडमधील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली आहे.

महिला आयोगानेही या घटनेबाबत सविस्तर अहवाल मागवला आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या ममता कुमारी यांनी रविवारी पीडित महिलेची भेट घेऊन घटनेची माहिती घेतली. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून पुरावेही गोळा केले.

पीडितेने सांगितले की, ती तिच्या पतीसोबत बाईकवर जग फिरायला निघाली होती. दोघेही 1 मार्च रोजी कोलकाता येथून मोटारसायकलवरून नेपाळला निघाले होते. दुमका येथील कुरमहाटजवळ अंधार पडल्यावर त्यांनी तिथे थांबण्याचा निर्णय घेतला. दोघांनी रस्त्यापासून एक किलोमीटर अंतरावर तंबू ठोकला, त्याच ठिकाणी महिलेवर सामूहिक बलात्कार झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Deepika Padukon : बायकोला सांभाळत रणवीरचं सहकुटूंब मतदान; दीपिकाच्या बेबी बंपने वेधलं लक्ष

धक्कादायक! नालासोपारा मतदारसंघातील तब्बल 'इतके' लाख मतदार गायब; निकालावर होणार थेट परिणाम

Magical Blanket : सत्यात अवतरलं क्षणात गायब करणारं हॅरी पॉटरचे जादुई ब्लॅंकेट, हे गॅजेट आहे कमाल

SCROLL FOR NEXT