Hutatma Smriti Day : सध्या काँग्रेस नेते राहुल गांधी भारत जोडो यात्रा करत आहेत. काँग्रेस हा राजकीय पक्ष असला तरी राहूल गांधी यांनी उभारलेल्या या यात्रेचे रूपांतर आता चळवळीत झाले आहे. लाखो लोक रोज या चळवळीत सहभागी होत आहेत. ही गोष्ट आठवण्याचे कारण म्हणजे आजच्याच दिवशी २१ नोव्हेंबर १९५६ रोजी मूंबईसह संयुक्त महाराष्ट्र करण्यासाठी महाराष्ट्रात मोठी चळवळ उभारली होती.
त्या चळवळीला आज ६६ वर्ष पूर्ण झाली. या लढ्यात १०६ हुतात्म्यांनी बलिदाना दिले आहे. या हुतात्म्यांनी केलेल्या त्यागामुळे तत्कालीन सरकारला मुंबई महाराष्ट्राला द्यावी लागली. काय होता तो लढा, त्यावर एक नजर टाकूयात.
सर्वांना ज्ञात आहे की, १९४७ मध्ये भारत इंग्रजांच्या तावडीतून मुक्त झाला. त्याआधी ब्रिटीश सरकारने त्यांच्या सोयीसाठी देशाची विभागणी वेगवेगळ्या प्रांतात केली होती. त्यामूळे देश स्वातंत्र्य झाल्यावर देशात भाषेनूसार विभागणी करण्याची मागणी जोर धरू लागली.
१९२० रोजी नागपुरात झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या वेळी भाषावर प्रांतरचेनेचा मुद्दा महात्मा गांधींनी मान्य केला होता. लोकमान्य टिळक हे देखील भाषावर प्रांतरचनेच्या बाजूने होते. काँग्रेसनेच एकेकाळी मान्य केलेला हा मुद्दा स्वातंत्र्यानंतर मात्र काँग्रेसला मान्य नव्हता. त्यामूळे सुरूवातीपासूनच त्याला विरोध होऊ लागला. या मागणीवर विचार करण्यासाठी काँग्रेसने ‘JVP’ समिती नेमली.
१९६१ मध्ये गोव्याच्या मुक्ती संग्रामापाठोपाठ संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाला सुरुवात झाली. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक मराठी माणलाच्या हक्काची ही लढाई होती. जात-धर्म-पक्ष-विचारसरणी आदी भेद बाजूला सारून सारा महाराष्ट्र अस्तित्वासाठी एकटवला होता. सत्याग्रह हे या लढ्याचे मुख्य शस्त्र होते.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीने त्रिराज्य योजनेस पाठिंबा दिला व शंकरराव देव यांनी संयुक्त महाराष्ट्र परिषद बरखास्त केली. १८ नोव्हेंबर १९५५ रोजी मुंबई विधानसभेसमोर या निर्णयाचा निषेध करण्यासाठी बंद पुकारण्यात आला. व सत्याग्रह करण्याचा निर्णय झाला. सेनापती बापट यांनी सत्याग्रहाचे नेतृत्व केले. त्यानंतर संप, बंद व मोर्चे यांचे सत्र सुरू झाले.
पोलिसांनी २१ नोव्हेंबर १९५५ रोजी निदर्शकांवर गोळीबार केला. या गोळीबारात १५ माणसे ठार झाली. संयुक्त महाराष्ट्रासाठीची चळवळ या गोळीबारानंतर उग्र झाली. संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढविण्यासाठी काँग्रेस पक्षीय पुढाऱ्यांना दूर सारून महाराष्ट्रातील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी संयुक्त महाराष्ट्र समितीची ६ फेबुवारी १९५६ रोजी स्थापना केली. एस्. एम्. जोशी, भाई श्रीपाद अमृत डांगे, ना. ग. गोरे, आचार्य प्र. के. अत्रे, उद्धवराव पाटील, माधवराव बागल, प्रबोधनकार ठाकरे, जयंतराव टिळक प्रभृती हे या चळवळीचे प्रमूख नेते होते.
हे आंदोलन दडपण्याकरिता तत्कालीन मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री असलेल्या मोरारजी देसाईंच्या शासनाने कठोर निर्णय घेतले. या चळवळीत एकूण ३१,०९२ आंदोलकांना अटक करण्यात आली. १९,४४५ लोकांवर खटले चालवण्यात आले. त्यांतील १८,४१९ लोकांना अटक करण्यात आली. या लोकांना कैदेची शिक्षा झाली.
मुंबईसह राज्यवर दंगली उसळल्या. त्यात ५३७ वेळा गोळीबार करण्यात आला. सुमारे ५०० दुकाने लुटली शेकडो गाडयांची मोडतोड करण्यात आली. त्या वेळी झालेल्या गोळीबारामध्ये १०६ माणसे बळी गेली. त्यांचे स्मारक पुढे हुतात्मा स्मारक म्हणून मुंबईत फ्लोरा फाउंटनजवळ उभारण्यात आले.
शूरवीरांच्या या लढ्यानंतर १ मे १०६० रोजी महाराष्ट्र राज्य स्थापन झाले. महाराष्ट्र राज्याचे उद्धाटन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते करण्यात आले. गुजरात आणि महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रदेशांचा समावेश करण्यात आला होता. मराठवाड्याचा भाग शेकडो वर्षांनंतर संयुक्त महाराष्ट्राचा भाग बनला होता. ही एक ऐतिहासिक घटना होती.
बेळगाव प्रश्नी दिसले कर‘नाटकी’ सरकार
१९६९ पासून बेळगाव महाराष्ट्रात यावे यासाठी वेळोवेळी शिवसेना प्रमूख बाळासाहेब ठाकरे यांनी पाठपुरावा केला होता. पण, त्याला काँग्रेस सरकारने दाद दिली नाही. अखेर, २००० ली जेव्हा केंद्रात भाजपचे सरकार आले तेव्हा दिवंगत नेते अटल बिहारी वाजपेयी त्यावेळेला पंतप्रधान होते. बाळासाहेबांनी वाजपेयी ना विनंती केली की बेळगावचा सीमाप्रश्न याबाबत तोडगा काढावा.
त्यानंतर २००२ साली कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना संयुक्तरीत्या बैठकीचे आवाहन केले. पण कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवनी पाठ फिरवली. ते बैठकीला आलेच नाहीत. त्यामुळे ही बैठक अयशस्वी झाली. यावर बाळासाहेबांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.