Hyderabad Horror 
देश

क्रूरतेचा कळस! आई-वडिलांचं छत्र हरपलेल्या 15 वर्षीय मुलीवर घरात घुसून सामूहिक बलात्कार

Sandip Kapde

Hyderabad Horror: हैदराबादमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका १५ वर्षीय मुलीवर तिघांनी तिच्या घरी सामूहिक बलात्कार केला. ही घटना मीरपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नंदनवनम कॉलनीत रविवारी सकाळी ९:३० वाजता घडली. ही घटना उघडकीस येताच शहरातील नागरिक हादरले असून संतापाचे वातावरण आहे.

नराधम दारुच्या नशेत एका मुलीच्या घरात घुसले. यावेळी पीडितेला आणि तिच्या भावाला आरोपींनी चाकुच्या धाकावर धमकावले. यानंतर अल्पवयीन मुलीला वरच्या मजल्यावर नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. पीडितेने मदतीसाठी ओरडाओरड केल्यानंतर आरोपींनी पळ काढला.

यावेळी पीडितेच्या भावाला घराबाहेर काढून मारहाण करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. पोलिसांनी फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी सात पोलिस पथके तयार करण्यात आली आहेत. (Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पॉस्को) कायदा, २०१२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी सखी केंद्रात पाठवले. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिस आसपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.

याप्रकरणी पोलिसांनी संशयितांनाही ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. मात्र मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. रचकोंडा पोलिस आयुक्त डी एस चौहान यांनी घटनास्थळी आणि मीरपेट पोलिस स्टेशनला भेट दिली.

आई-वडिलांचे छत्र हरवल्यानंतर दोघे बहिण-भाऊ त्यांच्या नातेवाईकांकडे राहत होते. पीडितेच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, ते पहाटे साडेपाच वाजता कामावरून परत आले. (Latest Marathi News)

पीडितेच्या भावाने सांगितले की, "सकाळी साडेनऊच्या सुमारास आठ जणांचे टोळके चाकू घेऊन आमच्या घरात घुसले. त्यांनी माझ्या बहिणीला वरच्या मजल्यावर नेले. सुमारे ३० मिनिटांनी ते निघून गेल्यावर माझी बहीण आमच्याकडे रडत रडत आली आणि म्हणाली की त्यांनी तिच्यावर अत्याचार केला आणि आम्हाला पोलिस स्टेशनला नेण्यास सांगितले."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT