देश

Hyundai अन् कश्मीर वाद काय? एका चुकीमुळं उठला कंपनीचा बाजार

सुधीर काकडे

दक्षिण कोरियाची प्रसिद्ध कार कंपनी ह्युंदाई सध्या वादात सापडली आहे. भारतात ह्युंदाईवर मोठी टीका होत असून, ह्युंदाईच्या अडचणींमध्ये वाढ होत आहे. पाकिस्तानमधील एका ह्युंदाई डीलरने काश्मीरमधील फुटीरतावाद्यांचं समर्थन देणारं एक ट्विट केलं अन् त्यानंतर हा वाद सुरू झाला. यानंतर मोठा गदारोळ झाला. ह्युंदाईच्या डीलरने केलेल्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर भारतीय युजर्सने प्रचंड नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आता ह्युंदाईवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन लोकांकडून करण्यात येतंय.

  • एका ट्विटर हँडलवरून करण्यात आलेल्या ट्विटनंतर हा वाद सुरू झाला. @PakistanHyundai या हँडलवरून 'काश्मीर एकता दिवस' च्या समर्थनार्थ एक संदेश ट्विट करण्यात आला होता. यावेळी हा दिवस म्हणजे स्वातंत्र्याचा संघर्ष असल्याचं म्हटलं. या ट्विटवर लोकांनी राग व्यक्त केला. अनेकांनी यावर प्रतिक्रीया दिल्यानंतर पुढच्या काही तासांतच #BoycottHyundai हा टॅग भारतात ट्रेंड होऊ लागला.

  • जगातील 200 हून अधिक देशांमध्य असलेल्या ह्युंदाईच्या पाकिस्तानमधील पार्टनर निशात ग्रुपच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्रामवरून करण्यात आलेल्या पोस्टमुळे मोठा वाद निर्माण झाला. त्यानंतर आता कंपनीला भारतात मोठ्या रोषाला सामोरं जावं लागतंय. 2020 मध्ये भारत-चीन सीमा विवादानंतर ट्विटर वापरकर्त्यांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते.

  • भाजपच्या आंतरराष्ट्रीय रणनितीचे प्रभारी विजय चौथाइवाले यांनी ह्युंदाई कार कंपनीला या प्रकरणावर आपली भुमिका मांडण्याचं आवाहन केलं आहे.

  • सोशल मिडियावर झालेल्या मोठ्या गदारोळानंतर ह्युंदाईनेही आपली बाजू मांडली असून, भारत म्हणजे आपल्यासाठी दुसरं घर असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. तसंच अशा प्रकारच्या कोणत्याही कृत्याचं आम्ही समर्थन करत नाही असं कंपनीने म्हटलं आहे.

  • शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही या प्रकरणावर आपली बाजू मांडली असून, कंपनीने या प्रकरणात स्पष्ट शब्दात माफी मागितली पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Export: कांदा उत्पादकांना मोठा दिलासा! केंद्र सरकारची कांदा निर्यातीला परवानगी

IPL 2024 DC vs MI Live Score : मुंबईने जिंकली नाणेफेक! जाणून घ्या दोन्ही संघाची प्लेइंग ११

Mamata Banerjee: ममता बॅनर्जींचा पुन्हा अपघात! हेलिकॉप्टरमध्ये जाताना पाय निसटला अन्..; पाहा व्हिडिओ

'श..श...शशांक...', KKR विरुद्ध विजयानंतर पंजाबच्या पठ्ठ्यानं शाहरुखच्या स्टाईलमध्ये ईडन गार्डन्सचे मानले आभार, पाहा Video

Bank Crisis: मोठ्या आर्थिक संकटाची सुरुवात? अमेरिकेत आणखी एक बँक दिवाळखोर; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT