Former Madhya Pradesh chief minister, Kamal Nath Planning to Retire 
देश

राजकारण सोडण्याची नौटंकी; कमलनाथ यांचे वक्तव्य नेमकं कशासाठी?

सकाळ ऑनलाईन टीम

Former Madhya Pradesh chief minister Kamal Nath  Planning to Retire मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ (Kamalnath) यांनी पोट निवडणुकीतील पराभवानंतर मोठे विधान केले आहे. छिंदवाडा येथील सौसरमध्ये एका कार्यक्रमात त्यांनी राजकारण सोडण्याचे संकेत दिले आहेत. या कार्यक्रमातील आपल्या भाषणात कमलनाथ म्हणाले की, मला खूप काही मिळाले आहे. आता कोणत्याही पदाची आशा नाही. आता मी घरात बसायलाही तयार आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर कमलनाथ राजकारणातून निवृत्त होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. 

त्यानंतर यात काँग्रेसने उडी घेतल्याचेही पाहायला मिळाले. माजी मंत्री पीसी शर्मा यांनी कमलनाथ यांचे विधान चुकीच्या पद्धतीने पसरवले जात असल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही तर काँग्रेस  2023 ची विधानसभा निवडणुक कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालीच लढेल, असा दावाही केलाय. कमलनाथ यांचे जनसंपर्क अधिकारी नरेंद्र सलूजा यांनीही यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. ज्या दिवशी जनतेला वाटेल त्या दिवशी राजकारणातून निवृत्ती घेईन, असे कमलनाथ म्हणाले होते.

त्यांच्या या वक्तव्यानंतर लोकांनी घोषणाबाजी केली. तुम्हाला पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाल्याचे पाहायचे आहे, अशा आशयाच्या घोषणा देण्यात आल्या. कमलनाथ राजकारणात राहून जनसेवेचे काम करतच राहणार आहेत, असेही नरेंद्र सलूजा यांनी म्हटले आहे.  

मध्य प्रदेशमधील पोट निवडणुकीत 28 पैकी 9 जागेवरच काँग्रेसला यश मिळाले. त्यानंतर राज्यात कमलनाथ यांच्या विरोधात वातावरण तापत आहे. त्यामुळे कमलनाथ आणि काँग्रेसचा गड असलेल्या भाषणातील विधानावर चांगलीच चर्चा रंगली आहे. कमलनाथ केवळ पद सोडण्यासाठी तयार होणार की राजकारणाला रामराम करणार? असे तर्कवितर्क लढवण्यास सुरुवात झाली आहे. आपल्या बालेकिल्ल्यातील लोक आपल्यासोबत आजही आहेत हे देखील सांगण्याचा प्रयत्न त्यांचा असू शकतो. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara News: सातारा जिल्ह्यातील ‘जयवंत शुगर’, ‘ग्रीन पॉवर’ला ३८ लाखांचा दंड; साखर आयुक्तांचे आदेश, नेमकं काय कारण?

Panchang 18 December 2025: आजच्या दिवशी दत्त कवच स्तोत्राचे पठण व ‘बृं बृहस्पतये नमः’ या मंत्राचा जप करावा

फायद्याची बातमी! नोटरी केलेल्या गुंठेवारीची आता करता येणार खरेदी; पूर्वीच्या गुंठ्याची करता येणार थेट विक्री, कशी असणार प्रक्रिया, वाचा...

ढिंग टांग - सं. मनोमीलन : अंक दुसरा..!

मोठी बातमी! हातभट्टी ज्यांच्या जमिनीवर त्या मालकावरच आता दाखल होणार गुन्हे; राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांचा इशारा; तलाठी, ग्रामसेवकांना पत्र

SCROLL FOR NEXT