देश

जिग्नेश मेवाणीचा काँग्रेस प्रवेश अधिकृत नाही; स्पष्ट केलं कारण

विनायक होगाडे

नवी दिल्ली : जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता तसेच कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचा सदस्य कन्हैया कुमार तसेच गुजरातचे अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी यांनी आज काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांची काँग्रेस प्रवेशाची चर्चा सुरु होती. "आम्ही या तरुण नेत्यांसोबत काम करण्यास उत्सुक आहोत, कुमार आणि मेवानी, या देशातील सत्ताधारी फॅसिस्ट शक्तींना पराभूत करण्यासाठी लढणार," असे मत काँग्रेसचे संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी व्यक्त केले. मात्र जिग्नेश मेवाणी यांचा प्रवेश अधिकृत रित्या झाला नाहीये, याचं कारण त्यांनी स्वत:चं स्पष्ट केलंय.

यावेळी बोलताना जिग्नेश मेवाणी यांनी म्हटलंय की, काही तांत्रिक कारणांमुळे मी अधिकृतरित्या काँग्रेस पक्षामध्ये समाविष्ट होऊ शकत नाही. सध्या मी अपक्ष आमदार आहे. जर मी पक्षप्रवेश केला तर मी आमदार पदावर राहू शकत नाही. मात्र, मी काँग्रेसच्या विचारधारेसोबतच असेन. येत्या गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या चिन्हासह निवडणूक लढवेन.

लोकशाही आणि 'आयडीया ऑफ इंडिया' या दोन्हीला वाचवण्यासाठी मी काँग्रेस पक्षासोबत आहेत. या पक्षाने स्वातंत्र्याची लढाई लढली आणि ब्रिटीशांना देशाबाहेर काढलंय, म्हणूनच मी पक्षासोबत आहे.

कन्हैया कुमारने म्हटलंय की, आमचं हे म्हणणं आहे की आज देशाला भगतसिंगांच्या वीरतेची गरज आहे. गांधींच्या एकतेची गरज आहे. आंबेडकरांच्या समानतेची गरज आहे आणि हाच विचार जपण्याची गरज आहे, म्हणून मी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहे. मला असं जाणवतंय की, या देशात काही लोक, विचारधारा या देशातील चिंतन परंपरा, संस्कृती, इतिहास, वर्तमान आणि भविष्य खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्या विचारधारेला तुम्ही आपोआपच ओळखून जाल. आम्ही आमचे विरोधक ओळखून आहेत. त्यामुळे आम्ही असा निर्णय केला की या देशातील सर्वांत मोठी लोकशाही पक्षामध्ये प्रवेश करायचा. हेच या देशातील अनेक तरुणांन वाटतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ठाकरे बंधू एकटवले! ४ ऑक्टोबरला 'जनमोर्चा'ची घोषणा; नेमका मुद्दा काय?

Virat Kohli Retirement: २०२७ चा वर्ल्ड कप हा माझा भारतासाठी शेवटचा...; विराट कोहलीचे निवृत्तीचे संकेत, रोहित शर्माही म्हणाला की...

Amazon Great Indian Festival sale 2026: स्मार्टफोन्सवर ऑफरचा पाऊस; मिळणार भरघोस डिस्काउंट! पाहा कोणत्या फोनची किंमत किती?

Incognito मध्ये सर्च केल्यावर हिस्ट्री दिसत नाही; पण ‘या’ लोकांना तुमची माहिती कळू शकते

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात मनसे-ठाकरे गटाचा ४ ऑक्टोबरला संयुक्त मोर्चा

SCROLL FOR NEXT