Punjab Politics  Team eSakal
देश

सिद्धूंच्या राजीनाम्यावर पंजाबचे नवे मुख्यमंत्री चन्नी म्हणतात, "मला त्यांच्यावर..."

विनायक होगाडे

चंदीगढ : पंजाब काँग्रेसमध्ये सुरु असलेला घोळ आजही कायम असलेला दिसून आला आहे. आज पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपली नाराजी व्यक्त करत राजीनामा दिली आहे. त्यांनी राजीनामा देताना स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली आहे, मात्र मी काँग्रेसची सेवा करत राहीन असंही म्हटलं आहे. सुपूर्द केलेल्या राजीनाम्यामध्ये त्यांनी म्हटलंय की, माणसाचे चारित्र्य कोसळण्याची सुरुवात ही तडजोड करण्यापासून सुरु होते. मी पंजाबच्या भविष्या आणि कल्याणाबाबत तडजोड करु शकत नाही. त्यामुळेच मी पंजाब प्रदेश काँग्रेसचे काम करत राहीन.

यावर प्रतिक्रिया देताना पंजाबचे नवे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी म्हटलंय की, मला याबाबत काही माहिती नाही. मला नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर पूर्ण विश्वास आणि खात्री आहे. तर दुसरीकडे सिद्धू यांच्या राजीनाम्यावर माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी देखील खोचक आणि बोचरी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणालेत की, "मी तुम्हाला म्हणालो होतो...तो स्थिर माणूस नाहीय. पंजाब सारख्या सीमावर्ती राज्यासाठी ह योग्य माणसू नाही" असं कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी टि्वट केलं आहे. अमरिंदर सिंग भाजपामध्ये प्रवेश करतील अशी चर्चा सुरु असतानाच सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swami Samarth: स्वामी समर्थ महाराज स्वत: आशीर्वाद देताना... AI VIDEO व्हायरल, दर्शन चुकवू नका

आजचे राशिभविष्य - 18 सप्टेंबर 2025

सोलापुरात नवरात्रोत्सवही डीजेमुक्तच होणार! मध्यवर्ती मंडळांच्या एकाही पदाधिकाऱ्यांकडून ‘डीजे’ची नाही मागणी; पोलिस आयुक्त म्हणाले, साऊंड स्पीकरला परवानगी, पण...

अग्रलेख : चालढकल पुरे

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 18 सप्टेंबर 2025

SCROLL FOR NEXT