देश

नेहरुंची 'ती' भाषणे मला खूप आवडायची- गडकरी

वृत्तसंस्था

नवी दिल्ली- नेहरुंची भाषणे मला खूप आवडायची असे म्हणत केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नितिन गडकरी यांनी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्या भाषणाचे आणि त्यातून मांडण्यात आलेल्या विचाराचे कौतुक केले आहे. नेहरुंचे भाषण आपल्याला फार आवडत होते, असे त्यांनी म्हटले आहे. एका कार्यक्रमात भाषणादरम्यान त्यांनी असे सांगितले आहे.

गडकरी म्हणाले की, जवाहरलाल नेहरु म्हणायचे भारत हा देश नाही, लोकसंख्या आहे. या देशाचा प्रत्येक व्यक्ती देशासाठी प्रश्न आहे, समस्या आहे. त्यांचं हे भाषण मला खूपच आवडतं. त्यांमुळे मी इतकं जरुर करु शकतो की, देशासमोर मी समस्या बनून राहणार नाही. सहिष्णुता भारताची सर्वांत मोठी देणं असून ही आपल्या व्यवस्थेचा एक मोठा भाग आहे. त्यामुळे एखाद्याने चुकीचं केलं तर आपणही त्याला तशीच प्रतिक्रिया द्यायची ही मानसिकता ठीक नाही. नेहरुंनी म्हटले होते की, भारत एक देश नाही तर लोकसंख्या आहे. जर आपण एखाद्या समस्येवर तोडगा काढू शकत नसू तर आपल्याला या समस्येचा भागही बनता कामा नये, असे म्हणत त्यांनी एकप्रकारे नेहरूंचे जाहीररित्या कौतुकच केले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, निवडणुका जिंकणे चांगले आहे. मात्र, निवडणुक जिंकून जर तुम्ही लोकांच्या जीवनात बदल घडवता येत नसेल तर आपलं सत्तेत येण्याने आणि जाण्याने कोणताही फरक पडत नाही. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींची आठवण काढत ते म्हणाले, सरकारे येतील जातील मात्र, देश कायम राहणार. हा देश कोणत्याही पक्षाचा नाही तर 130 कोटी भारतीयांचा असल्याचेही गडकरींनी यावेळी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parveen Shaikh: इस्रायल-हमास युद्धावर पोस्ट केल्याने प्रिन्सिपलला राजीनाम्याचे आदेश, पालकांनी उचलले महत्त्वाचे पाऊल

नेत्याचे एका दिवसात दोन पक्षप्रवेश, आधी शिंदे गटात मग ठाकरे गटात; काय आहे प्रकरण?

CSK प्लेऑफच्या शर्यतीत फसली! विजयासह पंजाब किंग्सचे आव्हान कायम; चेन्नईचा पाचवा पराभव

Eknath Shinde: ठाण्याचे किल्लेदार शिंदेच; मतदारसंघ खेचून घेतलाच, ठाकरेंशी होणार थेट लढत

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT