babasaheb ambedkar jayanti ESAKAL
देश

Babasaheb Ambedkar: ...तर संविधान जाळणारा मी पहिला व्यक्ती असेन; आंबेडकर संसदेत असं का म्हणाले होते?

Babasaheb Ambedkar Jayanti: संविधान निर्मितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सिंहाचा वाटा होता हे आपल्याला माहिती आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- संविधान निर्मितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सिंहाचा वाटा होता हे आपल्याला माहिती आहे. बाबासाहेब संविधान मसुदा समितीचे प्रमुख होते. २९ नोव्हेंबर १९४९ पर्यंत संविधान लिहून तयार झाले होते, त्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी संविधान लागू करण्यात आले. संविधान लागू झाल्यानंतर तीन वर्षांनी बाबासाहेबांनी संविधान जाळण्याची भाषा केली होती. असं वक्तव्य करण्यामागचं कारण आपण जाणून घेऊया.

२ सप्टेंबर १९५३ रोजी संविधानातील दुरुस्तीप्रकरणी राज्यसभेत वाद सुरु होता. अल्पसंख्यकांच्या हितांचे रक्षण व्हावे अशी बाबासाहेबांची ठाम भूमिका होती. बहुसंख्याक लोक अल्पसंख्याकांना नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे, असं बाबासाहेब म्हणाले होते. (I will be the first person to burn the constitution Why did babasaheb ambedkar jayanti say this in Parliament)

माझे मित्र म्हणतात की संविधान मी बनवलं आहे. मी सांगू इच्छितो की संविधानाचा दुरुपयोग होतोय असं जर मला वाटलं तर ते जाळणारा मी पहिला व्यक्ती असेन. एकीकडे अल्पसंख्य आहेत तर दुसरीकडे बहुसंख्य. बहुसंख्य असं म्हणू शकत नाहीत की अल्पसंख्याकांना महत्व दिलं जाऊ नये. असं केल्याने लोकशाहीचे नुकसान होईल, असं बाबासाहेब म्हणाले होते.

राज्यसभेत ही चर्चा झाल्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे १९ मार्च १९५५ रोजी हाच मुद्दा पुन्हा चर्चेला आला. यावेळी संविधानात चौथी दुरुस्ती केली जाणार होती. यावेळी चर्चेदरम्यान खासदार डॉ. अनूप सिंह यांनी बाबासाहेबांना त्यांच्या दोन वर्षांपूर्वीच्या वक्तव्याची आठवण करुन दिली. यावर बाबासाहेब म्हणाले होते की, त्यावेळी मी माझं वक्तव्य पूर्ण करु शकलो नव्हतो. मी पूर्ण विचार करुन म्हटलं होतं की संविधान जाळणारा मी पहिला व्यक्ती असेल.

मंदिरात राक्षस राहु लागले तर?

देव येऊन राहावा यासाठी आपण मंदिर बांधतो. पण, देवाच्या आधीच राक्षस येऊन राहायला लागले तर मंदिराला नष्ट करण्याशिवाय दुसरा कोणता पर्याय राहत नाही. तेथे राक्षस राहतील असा विचार करुन कोणी मंदिर बांधत नाही. मंदिरात देव राहावेत असं सर्वांना वाटतं. याच कारणामुळे मी संविधान जाळण्याची भाषा केली होती, असं बाबासाहेब म्हणाले होते.

बाबासाहेबांना प्रतिवाद म्हणून संसदेत असं म्हणण्यात आलं की, मंदिराला नष्ट करण्यापेक्षा राक्षसाला नष्ट का केलं जाऊ नये? यावर बाबासाहेब म्हणाले की, आपण असं करु शकत नाही. आपल्याकडे इतकी ताकद नाही. प्रत्येकवेळी राक्षसांनी देवाला हरवलं आहे. अमृत त्यांच्याकडे होते, त्यामुळे देवांना पळावं लागलं होतं. संविधानाला पुढे घेऊन जाताना आपल्याला अल्पसंख्याकांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.

संविधानात केल्या जाणाऱ्या अनेक दुरुस्त्यांवर बाबासाहेब नाराज होते. बाबासाहेबांचं म्हणणं होतं की, संविधान कितीही चांगलं असलं तरी त्याला चांगल्या प्रकारे लागू केले नाही तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Report 2025: भारतीयांच्या सरासरी मासिक पगारात ७ वर्षांत फक्त ४,५६५ रुपयांची वाढ! सरकारी आकडेवारी समोर

Pune Murder News : पुण्यात पहाटे खुनाचा थरार! तरुणाच्या डोक्यात दगड घालून हत्या; कुठं घडली घटना?

Latest Marathi News Live Update: गौतमी पाटीलच्या वाहनाचा अपघात प्रकरण, अपघातावेळी चालकाने मद्य प्राशन केले नसल्याचे स्पष्ट

Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाचा मुहूर्त ठरला! उद्घाटनानंतर ६० दिवसांत होणार पहिलं उड्डाण; कसं असेल नवं विमानतळ?

Nagpur Fraud: व्यापारी पगारिया यांची १८.३० कोटींनी फसवणूक; करारानंतरही विदेशी कंपनीकडून माल पाठविण्यास टाळाटाळ

SCROLL FOR NEXT