arvind kejariwal.
arvind kejariwal. 
देश

केजरीवालांचा शेतकऱ्यांच्या समर्थनात एक दिवसाचा उपवास; लोकांनाही केलं आवाहन

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- कृषी कायदे रद्द करण्याच्या मुद्द्यावरुन शेतकरी गेल्या 16 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल शेतकऱ्यांच्या समर्थनात सोमवारी एक दिवसाचा उपवास करणार आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन याची घोषणा केली.

अरविंद केजरीवाल म्हणाले की, शेतकऱ्यांनी 14 डिसेंबर रोजी एक दिवसाच्या उपवासाची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांनी संपूर्ण देशाला आवाहन केले आहे, की त्यांच्या समर्थनात एक दिवसाचा उपवास ठेवावा, मी पण एक दिवसाचा उपवास ठेवेन. आम आदमी पार्टीच्या सर्व समर्थकांना आणि स्वयंसेवकांना मी आवाहन करतो की त्यांनी सोमवारी एक दिवसाचा उपवास ठेवावा आणि शेतकऱ्यांना समर्थन द्यावे. देशाच्या सर्व लोकांना मी आवाहन करतो, लाखो-करोडो लोक शेतकऱ्यांसोबत आहेत. शेतकऱ्यांची मागणी योग्य आहे. त्यामुळे सर्व भारतीयांनी एक दिवसाचा उपवास करावा. 

Parliament Attack 2001: लोकशाहीच्या मंदिरावर कसा झाला दहशतवादी हल्ला?

केंद्र सरकारवर निशाणा साधताना केजरीवाल म्हणाले की, केंद्र सरकारचे काही मंत्री आणि भाजपचे लोक वारंवार म्हणताहेत की शेतकरी देशद्रोही आहेत आणि हे आंदोलन देशद्रोह्यांचं आहे, येथे अँटी नॅशनल लोक बसले आहेत. मी त्यांचा विचारू इच्छितो, याठिकाणी अनेक माजी सैनिक बसले आहेत, ज्यांनी देशासाठी आपल्या जीवाची बाजी लावली होती. हे सर्व लोक अँटी नॅशनल आहेत का?

मी भाजप नेत्यांना आणि केंद्रीय मंत्र्यांना विचारु इच्छितो की, असे किती खेलाडू आहेत, ज्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर देशासाठी पदकं जिंकली आहेत. असे कित्येक खेलाडू शेतकऱ्यांसोबत बसले आहेत. अनेक लोक घरून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. हे सर्व अँटी नॅशनल आहेत का? अनेक सेलिब्रिटी, सिंगर, डॉक्टर शेतकऱ्यांची मुले आहेत. ते शेतकऱ्यांचे समर्थन करत आहेत. सर्वांना तुम्ही अँटी नॅशनल ठरवणार का?

दरम्यान, कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी 'आर या पार'ची भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. 14 डिसेंबर रोजी सर्व शेतकरी प्रतिनिधी सिंघू बॉर्डवर उपोषणाला बसणार आहेत. पीटीआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. शेतकऱ्यांनी कृषी कायदे संपूर्णपणे मागे घेण्याची मागणी कायम ठेवली आहे. जर केंद्र सरकारला आमच्यासोबत चर्चा करायची असेल, तर आमची त्यासाठी तयारी आहे. पण, आधी आपण हे कायदे मागे घेण्याबाबत चर्चा करु ,असं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT