Chikkodi LokSabha Election Congress MLA Prakash Hukkeri esakal
देश

'हायकमांड, मुख्यमंत्र्यांनी दबाव आणला तरी, मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही'; काँग्रेस आमदाराची मोठी घोषणा

वारंवार मी निवडणूक लढविण्यासाठी काय मी फुटबॉल (Football) आहे का?

सकाळ डिजिटल टीम

पक्षाकडून कितीही दबाव आला तरी मी निवडणूक (Chikkodi Loksabha Constituency) लढविणार नाही. याबाबत सिद्धरामय्या यांना मी यापूर्वीच सांगितले आहे.

चिक्कोडी : मला शिक्षक मतदारसंघातून शिक्षकांनी सहा वर्षांसाठी निवडून दिले आहे. मला निवडणूक लढविण्यासाठी निवडलेले नाही. यापूर्वी मंत्री असताना लोकसभा निवडणूक (Loksabha Elections) लढविली होती. वारंवार मी निवडणूक लढविण्यासाठी काय मी फुटबॉल (Football) आहे का, असा सवाल करत आपण लोकसभा निवडणूक लढविणार नाही, अशी माहिती वायव्य शिक्षक मतदारसंघाचे विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी (Prakash Hukkeri) यांनी दिली.

केरूर येथे कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, यापूर्वी मी अनेक निवडणुका लढविल्या आहेत. आता माझा कार्यकाळ सहा वर्षांचा असल्याने लोकसभा अथवा राज्यसभा निवडणूक लढविणार नाही. मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांनी सांगितले तरी लोकसभा निवडणूक लढविणार नाही.

पक्षाकडून कितीही दबाव आला तरी मी निवडणूक (Chikkodi Loksabha Constituency) लढविणार नाही. याबाबत सिद्धरामय्या यांना मी यापूर्वीच सांगितले आहे. विधानपरिषद सदस्यपदाची निवडणूक बेळगावमधून लढविण्यासाठी उमेदवारी देण्यासाठी मागणी होती. त्यामुळे मी शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढवून विजयी झालो. आता निवडणुकीत उतरणार नाही. आपण कुठल्या उमेदवाराची शिफारस करणार का, या प्रश्नावर मी कुणाचीही शिफारस करणार नाही. पक्षश्रेष्ठी आपला निर्णय घेतील.

मी शिक्षक मतदारसंघात काम करत असून, तीन जिल्ह्यांत काम सुरू आहे. शिक्षकांच्या समस्या सोडवायच्या आहेत. त्यामुळे प्रभावी उमेदवार म्हणून मला उमेदवारी दिली तरी मी स्वीकारणार नाही. यापूर्वी मला अनेक निवडणुका लढविण्यास श्रेष्ठींनी सांगितल्यानंतर मी त्या लढविल्या आहेत. यावेळी मी कुठल्याही स्थितीत लोकसभा अथवा राज्यसभा निवडणूक लढविणार नाही. याबाबत मी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्पष्ट सांगणार आहे. निवडणूक न लढविण्याच्या माझ्या निर्णयावर ठाम आहे, असेही आमदार हुक्केरी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT