IAS Manisha Mhaiskar FB Post on 1992 Batch meeting of IAS PM modi ayodhya ram mandir pran pratishtha  
देश

Ayodhya Ram Mandir : 6 डिसेंबर 1992 च्या रात्री गुपचूप खाल्लेला पेढा... IAS मनिषा म्हैसकर यांची पोस्ट व्हायरल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्याकडे देश आणि जगभरातील रामभक्तांचे लक्ष लागले होते.

रोहित कणसे

Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येतील राम मंदिरात आज रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहत पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्याकडे देश आणि जगभरातील रामभक्तांचे लक्ष लागले होते. यादरम्यान काल आयएएस अधिकारी मनीषा म्हैसकर यांची एक फेसबुक पोस्ट चर्चेत आली आहे.

म्हैसकर यांनी त्यांच्या आयएएस ट्रेनिंग दरम्यान 1992 च्या आयएएस बॅचच्या फाउंडेशन कोर्सदरम्यानच्या एका घटनेचा किस्सा सांगितला आहे. यावेळी मसूरी येथे झालेल्या या बैठकीची सर्वत्र चर्चा झाला होती. तसेच आयएएसमध्ये जातीय कट्टरतावादी लोक घुसखोरी करत असल्याचे आरोप देखील करण्यात आला होता. मसूरी येथे ट्रेनिंग दरम्यान झालेल्या या बैठकीचा उल्लेख करत म्हैसकर यांनी फेसबुकवर ही पोस्ट लिहीली आहे. तसेच या बैठकीत एक पेढा खाल्ल्याची आठवण देखील सांगितली आहे.

म्हैसकर यांची पोस्ट जशी आहे तशी...

जय श्री राम

आयुष्याचं वर्तुळ पूर्ण होतं आणि … तेही कसं!

6 डिसेंबर 1992 हा मसुरीत अतिशय थंडीचा दिवस होता. 1992 ची आयएएस बॅच त्यांच्या फाउंडेशन कोर्समध्ये होती.

अयोध्येतील रामजन्मभूमीवरील महत्त्वाच्या घडामोडींच्या बातम्या हळूहळू पसरत होत्या. त्यावेळी एक अतिशय उत्स्फूर्त बैठक आयोजित करण्यात आली होती, परंतु अत्यंत विचारपूर्वक, केवळ निमंत्रीतांसाठी ही बैठक होती. माझी नागपूरशी घट्ट जोडली गेलेली नाळ निमंत्रण म्हणून पुरेशी मानली गेली. बैठकीच्या ठिकाणी काही जण जय श्री रामचा जयघोष करत होते, पेढे वाटले जात होते… मला एक केसर पेढा खाल्ल्याचे आठवते आणि त्या क्षणी 6 डिसेंबर 1992 च्या अत्यंत थंड रात्री मला माहित होते की अयोध्येतील घडामोडी ही कशाची तरी सुरुवात होती. खूप सकारात्मक, खूप शक्तिशाली, खूप शुभ…

या गोष्टी नेहमी होतात तशा पेढे वाटून खाल्ल्याची बातमी फुटलीआणि त्यातून खळबळ उडाली… नोटिसा बजावण्यात आल्या, जातीयवादी घटक आयएएसमध्ये घुसखोरी करत आहेत, असे सांगण्यात आले. एका मोठ्या दैनिकाच्या पहिल्या पानावर ही घटना छापून आली... 1992 च्या बॅचला निराशाजनक ठरवण्यात आलं, ज्यात प्रामुख्याने लहान शहरातील लोक होते - पॉश, स्मार्ट शहरातल्या मुलांना काय झालंय? धर्मनिरपेक्षता कुठे गेली? असे प्रश्न विचारण्यात आले.

आयुष्य पुढे जात राहिलं पण विश्वास दृढ होता - 6 डिसेंबर 1992 च्या रात्री गुपचूप खाल्लेला पेढा ही काहीतरी शक्तिशाली, काहीतरी सकारात्मक, काहीतरी शुभ अशी सुरुवात होती. आणि उद्याचा दिवस , 22 जानेवारी 2024 - अयोध्येतील राम लल्ला प्राणप्रतिष्ठा आणि प्रत्येकाला उत्सवात सामील होण्यासाठी राष्ट्रीय सुट्टीची घोषणा करून उजाडेल.

आज, पूर्वसंध्येला, मी दुसरा केसरी पेढा खात असताना मला 6 डिसेंबरचा मौलिक क्षण आठवला आणि त्यातून आलेली अतिशय सकारात्मक, शुभ शक्तिशाली भावना पुन्हा जागी झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT