Court News 
देश

प्रेमप्रकरणात अपयश आल्याने तरुणाने जीवन संपवलं, महिला दोषी असणार का? हायकोर्ट काय म्हणालं?

Love Failure: महिला जेव्हा त्याला बोलणं टाळायची तेव्हा तो तिला आत्महत्या करण्याची धमकी द्यायचा

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- तरुण एका तरुणीवर प्रेम करायचा, पण ते प्रेम यशस्वी झालं नाही आणि तरुणाने आत्महत्या केली. अशात दोषी कोण? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. याच संदर्भात दिल्ली हायकोर्टाने महत्त्वाची टिप्पणी केली आहे. प्रेम संबंधांसाठी कोर्टाची ही टिप्पणी मार्गदर्शक ठरणार आहे. 'लाईव्ह लॉ'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

एका प्रकरणावर कोर्ट सुनावणी घेत होतं. यामध्ये एका तरुणाने आत्महत्या केली होती. यावर कोर्टाने म्हटलंय की, प्रेम अयशस्वी ठरलं म्हणून तरुणाने आत्महत्या केली, अशा प्रकरणामध्ये महिलेला दोषी ठरवलं जाऊ शकत नाही. मृत तरुणाने सुसाईड नोट लिहिली होती. यात तरुणाने एक महिला आणि एका व्यक्तीला आत्महत्येसाठी जबाबदार धरलं होतं. (If A Lover died Due To Love Failure Lady Cannot Be Held For Abetment Of Suicide said Delhi High Court )

कोर्ट नेमकं काय म्हणालं?

दिल्ली हायकोर्टाचे न्यायमूर्ती अमित महाजन यांनी यावर सुनावणी घेतली. ते म्हणाले की, एखादा कमकुवत मनाचा व्यक्ती प्रेम भंग झाल्याने असे पाऊल उचलत असेल तर त्यासाठी अन्य व्यक्तीला दोषी का ठरवलं जावे?

एक प्रेमी प्रेम न मिळाल्याने आत्महत्या करतो, एक विद्यार्थी परीक्षेत चांगली कामगिरी न करता आल्याने आत्महत्या करतो, तसेच कोर्टाचा निकाल विरोधात गेला म्हणून एखाद्याने आत्महत्या केली तर महिला, पर्यवेक्षक, वकील यांना आत्महत्येला प्रवृत्त केले म्हणून दोषी ठरवलं जाऊ शकत नाही, असं न्यायमूर्ती महाजन यांनी स्पष्ट केलं.

एखाद्या कमजोर मनाच्या व्यक्तीने आत्महत्या केली म्हणून दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला जबाबदार धरणे योग्य नाही, असं कोर्टाने म्हटलं. कोर्टाने आत्महत्या प्रकरणात आरोपी असलेली एक महिला आणि एका पुरुषाला अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

प्रकरण नेमकं काय?

मृत मुलाच्या वडिलांच्या तक्रारीनुसार एफआयआर दाखल करण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे एका महिलेशी प्रेम संबंध होते. दोघांचा एक सामाईक (कॉमन) मित्र होता. आम्ही शारीरिक संबंध ठेवले असून लवकरच लग्न करणार आहोत, असं म्हणत त्या दोघांनी मृत तरुणाला भडकवलं असा आरोप आहे.

कोर्टाने म्हटलं की, व्हॉट्सअप चॅटवरुन असं दिसतंय की, मृत तरुण हा संवेदनशील मनाचा होता. महिला जेव्हा त्याला बोलणं टाळायची तेव्हा तो तिला आत्महत्या करण्याची धमकी द्यायचा. दरम्यान, कोर्टानं स्पष्ट केलं की, सुनावणीदरम्यान सुसाईड नोटमधील तथ्य तपासून पाहण्यात येतील. याशिवाय महिला आणि पुरुषाकडून मृत तरुणाला भडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता का? हे ही पाहिलं जाईल. (Crime News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Pune Kondhwa Rape Case : पुणे 'कुरियर बॉय' बलात्कार प्रकरण; आरोपीस अटक अन् धक्कादायक माहितीही उघड!

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

Ulhasnagar Crime : दारू पार्टीतील किरकोळ वादातून मित्राकडून मित्राचा खून; आरोपी शकील शेखला बेड्या

SCROLL FOR NEXT