PM Kisan 10th installment  esakal
देश

सोप्या स्टेप्सद्वारे PM Kisanचे 2000 रुपये खात्यात जमा होतील

PM Kisan: PM किसान योजनेच्या 10 वा हप्त्याचे 2000 रुपये खात्यात जमा नसतील तर तुम्ही तक्रार करू शकता.

सुरज सकुंडे

पीएम किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) :

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 1 जानेवारी रोजी पीएम किसान सन्मान निधीचा 10 वा हप्ता जारी केला. त्यानंतर अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधीचा 10 वा हप्ता आला आहे. 10व्या हप्त्यात (PM Kisan 10th Installment) 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 20 हजार 900 कोटी रुपये वर्ग केले आहेत. पीएम किसान योजनेंतर्गत, सरकारकडून लाभार्थी शेतकऱ्यांना एका आर्थिक वर्षात 6000 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

पंतप्रधान किसान सन्मान निधीमध्ये 4 महिन्यांच्या अंतराने 2,000 रुपयांचे तीन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. PM किसानचा 10 वा हप्ता अद्याप तुमच्या खात्यात आला नसेल, तर तुम्ही तक्रार करू शकता. जाणून घेऊया…

तुमचे नाव PM Kisan यादीत नसल्यास येथे कॉल करा -

तुमचे नाव PM किसान सन्मान निधीच्या 10 व्या हप्त्याच्या यादीत नसल्यास तुम्ही पीएम किसान सन्मान निधीच्या हेल्पलाइन नंबरवर कॉल करू शकता. हे क्रमांक आहेत 155261 आणि 011-24300606. येथे तुमची संपूर्ण समस्या समजून घेतली जाईल आणि ती सोडवण्यासाठी प्रयत्नही केला जाईल.

पीएम-किसान हेल्प डेस्कशी संपर्क साधता येईल (How to contact with Kisan Help Desk?) -

याशिवाय, सोमवार ते शुक्रवार, तुम्ही पीएम-किसान हेल्प डेस्कशी pmkisan-ict@gov.in वर ई-मेलद्वारे संपर्क साधू शकता.

PM Kisan चा हप्ता अडण्याची कारणं (Reasons for withholding installment-)-

सरकारकडून खात्यात पैसे ट्रान्सफर होतात, पण काही वेळा ते शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचत नाहीत. याचे मुख्य कारण तुमचे आधार, खाते क्रमांक आणि बँक खाते क्रमांकातील चूक असू शकते. त्यामुळे तुम्ही एकदा तुमची स्थिती तपासून घ्या.

PM Kisan मधील तुमचा तपशील (Status)असा चेक करा-

1. PM Kisan Yojna च्या https://pmkisan.gov.in. या अधिकृत वेबसाइटला भेट द्या

2. यानंतर 'फार्मर्स कॉर्नर'(Farmers Corner) या पर्यायावर क्लिक करा.

3. त्यानंतर 'लाभार्थी यादी' (Beneficiaries List) या पर्यायावर क्लिक करा.

4. तुमचे राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा.

5. आता 'Get Report' वर क्लिक करा.

6. तुमच्या समोर एक लिस्ट उघडेल, त्या यादीत तुमच्या खात्याचे स्टेटस कळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT