the kashmir files_KCR 
देश

जर पुरोगामी सरकार असतं तर 'या' फाईल्सवर सिनेमा आला असता - केसीआर

'द काश्मीर फाईल्स'वरुन तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचा भाजपवर निशाणा

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : 'द काश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) या चित्रपटावरुन तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (Telangana CM KCR) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. या चित्रपटावरुन त्यांनी थेट भाजप (BJP) आणि इतर पुरोगामी सरकारांची तुलना केली आहे. जर केंद्रात पुरोगामी सरकार असतं तर सिंचनाच्या फाईल्स, आर्थिक घोटाळ्यांवर सिनेमे बनवले असते, असं त्यांनी म्हटलं आहे. (if there is any progressive govt there should be irrigation files economic files says KCR)

मुख्यमंत्री केसीआर म्हणाले, "काश्मीर फाईल्स हा चित्रपट काय आहे? पुरोगामी सरकार असतं तर त्यांनी संचनाच्या फाईल्स, आर्थिक फाईल्सवर सिनेमा बनवला असता. 'द काश्मीर फाइल्स' कोणाला हव्या आहेत? दिल्लीतील काश्मीर पंडित म्हणतात की, काही लोक मतांसाठी हे करत आहेत. आम्हाला याचा कोणताही फायदा झालेला नाही"

सध्या काश्मीर फाईल्स या सिनेमावरुन देशभरात बऱ्याच उलट-सुलट चर्चा सुरु आहेत. तरीही या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली आहे. पंधरा दिवसात या सिनेमानं १७५ कोटींहून अधिक गल्ला जमवला आहे. सन १९९० मध्ये काश्मिरी पंडितांच्या विस्थापनावर बेतलेला हा सिनेमा आहे. अनेकांनी या सिनेमाचा अनुभव खूपच हृदयद्रावक असल्याचं म्हटलंय तर अनेक प्रेक्षकांनी सिनेमा पाहिल्यानंतर प्रक्षोभक विधानंही केली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार, मध्यरात्री दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांकडून हल्ला; घटना CCTVमध्ये कैद

Latest Marathi News Live Update : ९ फूट लांबीच्या अजगराचे थरारक रेस्क्यू; धारावीतील नॅचरल पार्क परिसरात सर्पमित्र पोलिसाची धाडसी कामगिरी

Coinex Pune 2025 : दुर्मीळ नाण्यांचा खजिना बघण्याची पुणेकरांना संधी; ‘कॉइनेक्स पुणे २०२५’ शुक्रवारपासून

बॉबी देओल पुन्हा एकदा दिसणार बाबा निरालाच्या भूमिकेत ? आश्रम सीजन 4 ची चर्चा

Solapur politics: अजय दासरींनी युवती सेनेत लुडबूड करू नये: शिवसेना ठाकरे युवती सेना जिल्हाप्रमुख पूजा खंदारे, पक्षात राहूनच पक्षाशी गद्दारी!

SCROLL FOR NEXT