Hemamalini sakal
देश

‘इफ्फी’मुळे भारतीय चित्रपटांना जगात स्थान; अनुराग ठाकूर

गेल्या ५२ वर्षात ‘इफ्फी’ने जगभरात भारतीय चित्रपटाला स्थान मिळवून दिले आहे. देशातील कलाकारांना मान सन्मान आणि ओळख मिळवून दिली.

सकाळ वृत्तसेवा

पणजी - गेल्या ५२ वर्षात ‘इफ्फी’ने जगभरात भारतीय चित्रपटाला स्थान मिळवून दिले आहे. देशातील कलाकारांना मान सन्मान आणि ओळख मिळवून दिली. या वर्षी आपण देशाच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करत आहोत आणि शताब्दीकडे वाटचाल करताना आपण येत्या २५ वर्षांत जगभरात ‘इफ्फी’च्या माध्यमातून देशाचा सिनेध्वज उंच फडकावत ठेवू या, असा निश्चय केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज व्यक्त केला. ताळगाव येथील शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये आयोजित ५२ व्या इफ्फीचे हेमामालिनी यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन झाल्यानंतर ते बोलत होते.

कार्यक्रमाला गोव्याचे राज्यपाल श्रीधरन पिल्ले, माहिती आणि प्रसारण मंत्रालय राज्यमंत्री डॉ एल मुरुगन, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, इफ्फी महोत्सवाचे संचालक चैतन्य प्रसाद, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. भारताची कथा ही भारतीयांनी लिहिलेली आणि परिभाषित केली आहे. त्यामुळे देशातील सिनेनिर्मात्यांनी आपल्या देशातल्या या सहयोगी वैविध्‍यतेला आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून सिनेमॅटिक कॅलिडोस्कोपचा एक भाग बनवावे, असे आवाहनदेखील यावेळी ठाकूर यांनी केले.

गोव्यात व्हावी फिल्मसिटी

गेल्या १७ वर्षांपासून इफ्फीचे आयोजन करणाऱ्या गोव्याचा लौकिक आज जगभरात पोहोचला आहे. देशविदेशातून याठिकाणी चित्रीकरणासाठी कलाकार येतात. मनोरंजनाच्या माध्यमातही आता गोवा स्वंयपूर्ण होत आहे. गोव्यात चित्रपट संस्कृती अधिक रुजण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा आणि राज्यामध्ये सरकारच्या वतीने किंवा जनता आणि सरकारच्या सहकार्यातून (पीपीपी) अद्ययावत फिल्मसिटी उभारण्यास पुढे यावे, अशी मागणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.

हेमामालिनी यांना पुरस्कार प्रदान

या सोहळ्यात अभिनेत्री हेमा मालिनी यांना भारतीय चित्रपट व्यक्तिमत्त्व-२०२१, हा पुरस्कार अनुराग ठाकूर, प्रमोद सावंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. गीतकार आणि सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी हे या पुरस्काराचे दुसरे मानकरी असून त्यांना इफ्फीच्या समारोपाच्या दिवशी सन्मानित करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India and Oman CEPA: भारत-ओमान करार लागू! होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर ही डील इतकी महत्त्वाची का? उद्योगांसाठी गेमचेंजर ठरणार

Mumbai News: 'वनराणी'ला पर्यटकांची पसंती! पाच महिन्यांत ३६ हजार जनाची सवारी, २९ लाख महसुलाची भर

MBA MMS CET Exam Result : एमबीए-एमएमएस सीईटीचा निकाल जाहीर; एकूण ८ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल गुण

Bhimashankar News : भाविकांसाठी आनंदाची बातमी! श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर सोमवारपासून होणार दर्शनासाठी खुले

Vidhan Parishad Election : महायुतीत ‘ऑल इज वेल’चा दावा; पण उमेदवारी अर्जावेळी दोन मंत्री, प्रमुख नेते अन् जिल्हाध्यक्ष अनुपस्थित, कारण काय?

SCROLL FOR NEXT