Training IT Training IT
देश

आयटीयन्स सापडले दुहेरी कात्रीत, एकीकडे कामाचा ताण तर दुसरीकडे संसर्गाची भीती

सकाळ वृत्तसेवा

बंगळुरू : देशाचे माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरूमधील बड्या आयटी कंपन्यांसमोरील आव्हाने कोरोनामुळे आणखी वाढली आहेत. या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर देखील दुहेरी ताण येताना दिसतो. एकीककडे वेळेत प्रकल्प पूर्ण करण्याचे आव्हान आणि दुसरीकडे कोरोनाच्या संसर्गाची भीती अशा दुहेरी कात्रीमध्ये ही मंडळी सापडली आहेत.

सध्या देशभरच ऑक्सिजन आणि वैद्यकीय संसाधनांचा तुटवडा जाणवत असताना बंगळुरू देखील त्याला अपवाद नाही. कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस अधिक जीवघेणा होत असताना काही कंपन्यांनीही ऑक्सिजन, औषधे आणि अन्य संसाधने युद्धपातळीवर गोळा करायला सुरुवात केली आहे. गोल्डमन सॅश आणि स्टॅण्डर्ड चार्टर्ड या दोन बड्या वित्तीय संस्थांची बंगळूर, चेन्नई आणि हैदराबादेत कार्यालये आहेत. या दोन्ही संस्थांनी त्यांच्या कार्यालयांमध्ये काम करणारे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी केंद्रे देखील उभारली आहेत. अनेक कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढला असून विप्रोतील कर्मचारी त्यांच्या कामाची डेडलाईन गाठण्यासाठी रोज १३ ते १४ तास काम करत आहेत, अशी माहिती एका कर्मचाऱ्याने दिली. अनेक कंपन्यांचे प्रमुख हे देशाबाहेरून काम करत असतात त्यामुळे त्यांना येथील परिस्थितीचे गांभीर्य कळू शकत नाही, अशी खंत काही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

निर्णय फिरवला -

अ‌ॅसेंच्युअर या बड्या कंपनीने कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सुविधा द्यायला सुरुवात केली असून कंपनीचे व्यवस्थापन मोफत लसीकरण देखील करणार आहे. बंगळुरूमध्ये अनेक कंपन्यांचे कॉल सेंटर आहेत. हजारो कर्मचारी यामध्ये काम करत असतात. अनेक कंपन्यांनी संसर्ग ओसरल्याने कर्मचाऱ्यांना कार्यालयांमध्ये बोलायला सुरुवात केली होती. आता संसर्गामध्ये अचानक वाढ झाल्याने काही कंपन्यांनी निर्णय फिरवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC मुख्यालयात रात्रीस खेळ चाले! निवडणूक जाहीर होताच प्रशासनाचा रात्रभर 'कारभार', आचारसंहिता भंग?

विदर्भाचे दोन्ही पोट्टे IPL मध्ये चमकणार! SRH-Mumbai Indians कडून उतरणार मैदानात, विदर्भाच्या क्रिकेटचा नवा अध्याय!

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर खंडपीठाच्या स्थापनेला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

Bank Holiday : आजपासून 5 दिवस देशभरातील बँका बंद! राज्यातील बँकाही 4 दिवस बंद; कधी ते जाणून घ्या?

Pradnya Satav : प्रज्ञा सातव यांचा आमदारकीचा राजीनामा, भाजपमध्ये आज प्रवेश; नाना पटोले म्हणाले- सत्तेतील पैशांतून खरेदी सुरुय

SCROLL FOR NEXT