Canva
देश

याच महिन्यात कोरोनाची तिसरी लाट, ऑक्टोबरमध्ये उद्रेक!

नामदेव कुंभार

Corona Third Wave : गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढण्यास सुरुवात झाली आहे. स्थिर झालेली कोरोना रुग्णसंख्या पुन्हा एकदा 40 हजारांच्या पुढे गेली आहे. त्यामुळे दुसरी लाट संपत असतानाच तिसऱ्या लाटेनं चाहूल दिली आहे का? अशी भिती व्यक्त केली जात असून असाच एक रिपोर्टही समोर आला आहे. हैदराबाद आणि कानपूर आयआयटीमधील मथुकुमल्ली विद्यासागर आणि मनिंद्र अग्रवाल यांनी एकत्रपणे केलेल्या अभ्यासात चिंताजनक रिपोर्ट्ससमोर आले आहेत. त्या रिपोर्ट्सनुसार, याच महिन्यात कोरोनाची तिसरी लाट (Third Wave of corona) येऊ शकते. दररोज एक लाखांपेक्षा जास्त नवीन कोरोना रुग्ण आढळू शकतात. तर ऑक्टोबरमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा उद्रेक होऊ शकतो.

ब्लूमबर्गनुसार विद्यासागर यांनी एका ईमेलमध्ये म्हटलेय की, केरळ आणि महाराष्ट्रातील स्थिती यापेक्षाही चिंताजनक आणि गंभीर होऊ शकते. तिसरी लाट दुसऱ्या लाटेपेक्षा धोकादायक नसेल, असेही रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. दुसऱ्या लाटेत प्रतिदिवस चार लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांची संख्या दिवसाला वाढली होती.

IIT हैदराबादचे प्रोफेसर विद्यासागर यांनी गणिताच्या मॉडेलच्या आधारावर मे महिन्यात कोरोना रुग्णवाढीवर आपला अंदाज बांधला होता. यामध्ये त्यांनी म्हटले होते की, जून महिन्याच्या अखेरपर्यंत दुसरी लाट ओसरेल. जून महिन्याच्या अखेरीस प्रतिदिन 20 हजार नवीन रुग्णांची नोंद होईल. मात्र, विद्यासागर यांचा अंदाज चुकीचा ठरला. प्रतिदिवस 40 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT