BJP vs DK Shivakumar esakal
देश

DK Shivakumar : उपमुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; डी. के. शिवकुमारांविरोधात FIR दाखल, काय आहे प्रकरण?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष (Congress) आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) यांना आणखी एक धक्का बसला आहे.

सकाळ डिजिटल टीम

शिवकुमार यांच्या चौकशीसाठी सीबीआयला दिलेली पूर्वपरवानगी सरकारने मागे घेतली होती. या पार्श्वभूमीचे प्रकरण लोकायुक्तांकडे वर्ग करण्यात आले.

बंगळूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष (Congress) आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) यांना आणखी एक धक्का बसला आहे. लोकायुक्त पोलिसांनी बेकायदेशीर मालमत्ता संपादनप्रकरणी शिवकुमार यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे. यातून सीबीआयकडे (CBI) असलेल्या या प्रकरणाची फेरचौकशी करण्यास लोकायुक्तांनी पुढाकार घेतला आहे.

लोकायुक्त पोलिसांनी सीबीआयला पत्र लिहून या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे देण्यास सांगितले आहे. मात्र, सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी लोकायुक्तांना अद्याप कोणतीही कागदपत्रे दिलेली नाहीत. त्याशिवाय सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयात (High Court) धाव घेतली असून, तपास पूर्णत्वास आला आहे. या प्रकरणात तपासासाठी दिलेली परवानगी मागे घेणे योग्य नाही, असा युक्तिवाद केला आहे.

शिवकुमार यांच्या चौकशीसाठी सीबीआयला दिलेली पूर्वपरवानगी सरकारने मागे घेतली होती. या पार्श्वभूमीचे प्रकरण लोकायुक्तांकडे वर्ग करण्यात आले. राज्य सरकारने २२ डिसेंबर रोजी लोकायुक्त डीजीपी यांना पत्र लिहून शिवकुमार यांच्याविरोधात चौकशीचे आदेश दिले होते. मात्र, आजपर्यंत एफआयआर नोंदविण्यात आलेला नाही. आता दीड महिन्यांनंतर लोकायुक्त पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ सामुद्रधुनी'वरून इराणमध्येच पडले दोन गट; लष्कर आणि सरकारमध्ये बिनसलं, जगावर पुन्हा इंधन संकटाचं सावट

Shirampur Murder: जेवण उशिरा मिळाल्याचा वाद जीवावर बेतला; हॉटेल मालकाची निर्घृण हत्या, श्रीरामपूर हादरले!

Latest Marathi News Update: आदिती तटकरे पालखी सोहळ्यामध्ये डोक्यावर तुळशी वृदांवन घेऊन सहभागी

Social Service Initiative: भिवधानोरा-पंढरपूर दिंडीतील वारकऱ्यांना तुकाराम सटाले यांच्याकडून रेनकोट वाटप; सेवाभावी उपक्रमाचे कौतुक

Davdi Free Eye Camp: दावडीत दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया; २ हजारांहून अधिक रुग्णांना नवदृष्टी

SCROLL FOR NEXT