ima writes to pm modi over evacuation on medical students stranded in Ukraine
ima writes to pm modi over evacuation on medical students stranded in Ukraine  sakal
देश

अडकेलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना बाहेर काढा; IMA चे PM मोदींना पत्र

सकाळ डिजिटल टीम

रशियाने युक्रेनवरील हल्ला केल्याने युक्रेनमध्ये भयावह परिस्थितीत राहणाऱ्या नागरिकांत हजारो भारतीय विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. दरम्यान इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून रशिया-युक्रेन संघर्षाच्या दरम्यान युक्रेनमध्ये अडकलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याची विनंती केली. वैद्यकीय संस्थेने केंद्राला वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी विशेष हेल्प डेस्क स्थापन करण्यास सांगितले.

पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात IMA ने म्हटले आहे की, "तुम्हाला माहिती आहे की, वैद्यकीय शिक्षण घेत असलेले हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यापैकी बहुतेकांना हवाई प्रवासाचा वाढलेला खर्च परवडत नाही. परवडणारे विद्यार्थी देखील तेथे प्रतिकूल परिस्थितीमुले प्रवास करू शकत नाहीत. दैनंदिन रेशन देखील कमी होत आहे, त्यांच्या जगण्यासाठी गंभीर अडचणी निर्माण होत आहेत.

भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी आपल्या केंद्र सरकारने केलेल्या विविध प्रयत्न करत आहे याची माहिती IMAला आहे. तरुण विद्यार्थ्यांना लवकरात लवकर परत आणण्यास प्राधान्य देण्यासाठी आम्ही तुम्हाला प्रामाणिकपणे आणि नम्रपणे आवाहन करतो, असे पत्रात म्हटले आहे. तसेच पत्रात पुढे, आम्ही सरकारला विनंती करतो की त्यांना आर्थिक मदत करावी आणि त्यांना बाहेर काढण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करावे असे म्हटले आहे.

यापूर्वी महाराष्ट्राचे मंत्री उदय सामंत यांनीही पंतप्रधानांना पत्र लिहून युक्रेनमधील 1,200 विद्यार्थ्यांच्या सुरक्षित परतीची व्यवस्था करण्याची विनंती केली होती. तसेच त्यांनी भारत सरकारने यापूर्वी अशाच परिस्थितीत इतर देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका केली आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील 1,200 विद्यार्थ्यांची तात्काळ सुटका करावी आणि विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात सुरक्षित परत आणण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात, अशी विनंती केली आहे

दरम्यान अनेक आठवड्यांच्या तणावानंतर अखेर गुरुवारी रशियाचे युक्रेनवर आक्रमण सुरू झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 DC vs LSG Live Score: अर्शदने फुलवल्या लखनौच्या आशा, एकीकडे विकेट जात असताना झळकावलं अर्धशतक

Ghatkopar hoarding : 'जीव वाचला पण रोजी रोटी गेली'; गंभीर जखमी झालेले टॅक्सी चालक सुभेदार मोर्या यांची व्यथा

Table Tennis: मनिका बत्राने रचला इतिहास! 'असा' पराक्रम करणारी बनली पहिलीच भारतीय महिला टेबल-टेनिसपटू

PM Modi: ना घर, ना जमीन; पंतप्रधान मोदींची किती आहे संपत्ती? शपथपत्रातून आलं समोर

IND W vs SA W: भारत दौऱ्यावर येणार दक्षिण आफ्रिका संघ! BCCI ने केली शेड्युलची घोषणा, पाहा कधी आणि केव्हा होणार सामने

SCROLL FOR NEXT