Cyclone Tej 
देश

Cyclone Tej : पुढील 24 तासांत धोकादायक रूप धारण करू शकते चक्रीवादळ 'तेज', IMDचा इशारा

रोहित कणसे

अरबी समुद्रात तयार झालेलं चक्रीवादळ धोकादयाक ठरण्याची शक्यात आहे. हवामान विभागाने अलर्ट जाहीर केला असून येत्या २४ तासांमध्ये याचा दबाव वाढण्याची शक्याता आहे. हमावान विभागाने वीएससीएस म्हणजेच खूप गंभीर स्वरूपाचे चक्रीवादळ असल्याचे सांगतले आहे.

हवामान विभागाने यापूर्वीच सांगितले होते की, हे चक्रीवादळ तेज हे 21 ऑक्टोबर रोजी 2330 IST या वेळेत दक्षिण आणि पश्चिम अरबी समुद्रावर सोकोट्रा (येमेन)च्या जवळपास 330 किमी पूर्वेस, सलालाह (ओमान) च्या 690 किमी दक्षिण पूर्व आणि अल घैदा (येमेन)च्या 720 किमी पूर्वेला केंद्रीय होतं. आता हे वादळ 22 ऑक्टोबरच्या दुपारच्या सुमारास अतिशय तीव्र चक्रीवादळात रूपांतरित होऊ शकते आणि त्याचा वेग आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) शनिवारी सांगितले की हे भीषण चक्रीवादळ 'तेज' हळुहळू नैऋत्य अरबी समुद्रावर पुढे सरकत आहे. गेल्या 6 तासांत वादळ ताशी 18 किमी वेगाने पश्चिम-वायव्य दिशेने सरकले आहे. 21 ऑक्टोबर रोजी IST 1730 वाजेपर्यंत, 'तेज' येमेनच्या सोकोत्रा ​​येथून सुमारे 440 किमी पूर्व-दक्षिणपूर्व, सलालाह, ओमानच्या 800 किमी दक्षिण-पूर्व आणि येमेनच्या अल घैदाहपासून 830 किमी आग्नेय पूर्वेस स्थित होते.

हवामान खात्याने दिला इशारा

हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे की चक्रीवादळ हा त्याचा मार्ग पश्चिम-वायव्य दिशेने चालू राहील आणि पुढील 12 तासांमध्ये ते अत्यंत तीव्र चक्रीवादळामध्ये रुपांतरीत होईल अशी शक्यता आहे. त्यानंतर 24 ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत दिशा बदलून उत्तर-पश्चिम दिशेकडे सरकून त्यानंतर उत्तर-उत्तर-पश्चिम दिशेकडे सरकण्याची शक्यता आहे. 25 ऑक्टोबरच्या सकाळी हे वादळ अल घैदा, येमेन आणि सलालाह, ओमान दरम्यान धडकण्याची शक्यता आहे.

या घटनाक्रमादरम्यान, IMD ने नैऋत्य अरबी समुद्रात चक्रीवादळ तेज साठी चेतावणी जारी केली आहे. मच्छिमारांना 25 ऑक्टोबरपर्यंत दक्षिण-पश्चिम अरबी समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पश्चिम-मध्य अरबी समुद्रात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून मच्छिमारांना 25 ऑक्टोबरच्या रात्रीपर्यंत या भागात जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. सध्या समुद्रात असलेल्या लोकांना तत्काळ किनारपट्टीवर परतण्यास सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

GATE 2027 Registration: आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परिक्षेची फी

Marathi News Live Updates : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी नेहा बोरा दाखल, विद्यार्थ्यांशी संवाद साधत जाणून घेतले प्रश्न

SCROLL FOR NEXT