Impact Of Bangladesh Violence On India Esakal
देश

India-Bangladesh: बांगलादेशातील अराजकतेचा भारतावर परिणाम! 5 मुद्दे वाढवणार PM Modi यांची चिंता

Impact Of Bangladesh Violence On India: शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर बांगलादेशच्या लष्करप्रमुखांनी म्हटले आहे की, देशात अंतरिम सरकार स्थापन केले जाईल आणि काही काळासाठी हा देश अंतरिम सरकार चालवेल.

आशुतोष मसगौंडे

बांगलादेशमध्ये सुरू असलेला हिंसाचार आणि राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला आहे. शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर देश सोडत भारतात आश्रय घेतला आहे.

शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर बांगलादेशच्या लष्करप्रमुखांनी म्हटले आहे की, देशात अंतरिम सरकार स्थापन केले जाईल आणि काही काळासाठी हा देश अंतरिम सरकार चालवेल.

दरम्यान, बांगलादेशात उद्भवलेल्या नवीन परिस्थितीचे भारत आणि जागतिक राजकारणावर मोठी परिणाम होऊ शकतात. याच बरोबर असे अनेक मुद्दे आहेत, जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी चिंतादायक ठरू शकतात.

बंगालच्या उपसागरात चीन घुसणार

स्ट्रिंग ऑफ पर्ल रणनीती अंतर्गत चीनला नेहमीच बांगलादेशात प्रवेश करायचा होता. बंगालच्या उपसागरात चीनच्या या रणनीतीविरुद्ध गेल्या दीड दशकापासून शेख हसीना या भारतासाठी ढाल म्हणून उभ्या होत्या.

पण, मूलतत्त्ववादी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी ढाक्यामध्ये सत्तेवर आल्यास पाकिस्तानप्रमाणे त्यांचाही कल चीनकडे अधिक असेल, कारण हे पक्ष सतत अपप्रचार करतात की भारतात मुस्लिमांवर अत्याचार होत असताना हसीना यांचे अजूनही भारतासोबत मैत्रीचे संबंध आहेत.

पश्चिम बंगाल आणि ईशान्येत अशांतता वाढेल

बांगलादेशच्या सीमेला लागून असलेल्या पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये भरातासाठी आव्हाने निर्माण होऊ शकतात. कारण या ठिकाणी असलेल्या गुन्हेगारी आणि असामाजिक घटक व नेटवर्कवर नियंत्रण ठेवण्यासाठी भारताला शेख हसीना यांच्या काळात बांगलादेशकडून सहकार्य मिळायचे. भविष्यात त्याची शक्यता कमी आहे.

बांगलादेशात कट्टरपंथी सत्तेवर आल्यास सीमेवर चकमकींबरोबरच संपूर्ण प्रदेशात अशांतता वाढण्याची शक्यता आहे.

घुसखोरीची समस्या

शेख हसीना यांनी देशाची अर्थव्यवस्था मजबूत केली. त्यामुळे देशातील विरोधक, प्रसारमाध्यमे आणि नागरिकांनी त्यांना लोकप्रिय केले. परंतु, कोविड महामारीतून अद्याप न सावरलेल्या बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेसाठी त्यांचे अचानक सत्तेतून बाहेर पडणे हे मोठे आव्हान आहे.

बांगलादेश आर्थिक संकटात सापडला तर त्याचा थेट परिणाम भारतावर होईल. त्यामुळे आधीच सुरू असलेली घुसखोरीची समस्या बिकट होणार आहे.

दहशतवाद

बांगलादेशात सुमारे 17 वर्षांच्या कार्यकाळानंतर हसीना यांची अचानक सत्ता सोडणे हा दहशतवादाविरुद्धच्या लढाई भारतासाठी मोठा धक्का आहे.

बांगलादेशातून हसीना यांचे जाणे म्हणजे भारताने या क्षेत्रातील विश्वासू मित्र गमावल्यासारखे आहे.

हसीना या नेहमीच भारताच्या मैत्रीण राहिल्या आहेत आणि बांगलादेशातून कार्यरत असलेल्या दहशतवादी गटांचा सामना करण्यासाठी त्यांनी भारतासोबत काम केले आहे.

हुकूमशाहीच्या समर्थनाचा आरोप

भारताने बांगलादेशमध्ये महिनाभर चाललेल्या अशांततेवर भाष्य करणे टाळले आणि हा बांगलादेशचा अंतर्गत प्रश्न असल्याचे म्हटले होते.

सामान्य नागरिक, विरोधक आणि प्रसारमाध्यमांविरुद्ध हसीना यांनी केलेल्या कारवाईवर पाश्चात्य देश प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. याचबरोबर त्यांनी हसीना यांना हुकूमशाही कार्यशैली बदलण्याची मागणी केली होती. गैरप्रकार झाल्याचे आरोप असूनही भारताने निवडणुकीला दिलेला पाठिंबा हा भारत आणि पाश्चात्य देशांमधील वादाचा विषय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT