Congress Journey in uUP Sakal
देश

''काही वर्षात काँग्रेसची ओळख जिल्हा पक्ष म्हणून होईल''

उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमधील निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठी हार पत्कारावी लागली आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभांच्या (Assembly Election ) निवडणुकीत मतदारांनी घराणेशाही आणि जातीयवादी पक्षांना नाकारले असून, येत्या 4-5 वर्षात भारतात जातीयवादी आणि कौटुंबिक पक्ष नाहीसे होतील आणि विकासाचे राजकारण सुरू होईल असे मत आसामचे मुख्यमंत्री हेमंता (Hemanta Biswa Sarma) बिस्वा सरमा यांनी व्यक्त केले आहे. तसेच 2026 पर्यंत काँग्रेस हा प्रमुख राजकीय पक्ष असणार नाही तर, जिल्ह्याचा पक्ष म्हणून तो कायम राहील असे ते म्हणाले. (Assam CM Hemanta Biswa Sarma On Congress)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या नेतृत्वावर देशातील जनतेचा विश्वास या निवडणुकांच्या निकालातून पुन्हा एकदा समोर आला आहे. येत्या निवडणुकीतही भाजपचा 'विजय रथ' पुढे जात राहील, असे देखील सरमा म्हणाले. काँग्रेस (Congress) एक प्रादेशिक पक्ष बनला असेही ते म्हणाले.

उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाने आपला गड राखला आहे. मागच्या वेळेपेक्षा कमी जागा आल्या असल्या तरीही निर्विवाद बहुमत भाजपला मिळालं आहे. भाजपाने 255 जागांवर आपली मोहोर उमटवली आहे. तर दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या समाजवादी पक्षाला 111 जागा मिळाल्या आहेत.

भाजपला एकूण मतांपैकी 41.29 टक्के मते प्राप्त झाली आहेत. तर समाजवादी पक्षाला 32.03 टक्के आणि बहुजन समाज पक्षाला 12.88 टक्के मते प्राप्त झाली आहे. मात्र, असं असलं तरीही भाजपलाही काही धक्के यावेळी नक्कीच बसलेले आहेत. समाजवादी पक्षाच्या जागा मागच्या वेळेपेक्षा दुप्पट झाला असल्याने ते समाधानी असू शकतात. मात्र, भाजपचे उप-मुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्यासहित राज्यातील 11 मंत्र्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

IND vs PAK सामन्यानंतर वातावरण तापलं; सूर्या अन् हार्दिक कुलदीप यादववर भडकले, नेमकं काय घडले; पाहा Viral Video

5G च्या नावाखाली तुमची फसवणूक तर होत नाहीये ना? घरबसल्या 'इथून' चेक करा तुमच्या एरियातलं नेटवर्क

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

Central Railway: शिमग्याला गावी जाणाऱ्यांसाठी आनंदवार्ता! विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ, आरक्षण सुरू; पाहा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT