Accident News Esakal
देश

Accident News: फोंडा-पणजी महामार्गावर मर्सिडीजमुळे भीषण अपघात, ३ जणांचा मृत्यू तर ७ जण गंभीर जखमी

मर्सिडीज कार चालकाला पोलिसांनी अटक केली आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

फोंडा-पणजी महामार्गावर बाणस्तारी पुलाजवळ काल (रविवारी रात्री ८ वाजता) भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. तर चौघेजण जखमी झाले. फोंड्याहून भरधाव येणाऱ्या (जीए - ०७ - के - ७३११) मर्सिडीज गाडीने सुरवातील तीन दुचाक्या आणि नंतर कारगाड्यांना ठोकले त्यामुळे हा विचित्र अपघात झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फोंडा-पणजी महामार्गावर बाणस्तारी पुलाजवळ रविवारी रात्री भीषण अपघात झाला. फोंड्याकडून गोव्याकडे जाणाऱ्या भरधाव मर्सिडिज कारने चारचाकी गाड्या आणि तीन दुचाकींना उडवल्याने ही दुर्घटना घडली.

या भीषण अपघातात दिवाडी येथील दुचाकीस्वार सुरेश फडते (वय ५८) व भावना फडते (वय ५२), तर अन्य एका दुचाकीवरील फातोर्डा येथील अनुप कर्माकर (वय २६) यांचा मृत्यू झाला आहे. या अपघातातील सात जखमींना बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. चारचाकीने जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील भावना फडते पुलाच्या खाली पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

दरम्यान, मर्सिडिज चालकाला मार्दोळ पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. परेश ए. सिनाई सावर्डेकर असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. मद्दधुंद अवस्थेत गाडी चालवण्याने हा अपघात झाल्याचा संशय व्यक्त केला असून या विचित्र अपघाताचा पोलीस सध्या अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fifa World Cup 2026 : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावाची फक्त 'हवा'! बलाढ्य पोर्तुगालला ५२ वर्षांनी वर्ल्ड कप खेळणाऱ्या काँगोने रडवले, धक्कादायक निकाल

T20 WC: धक्कादायक! भारताच्या प्रमुख खेळाडूला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले... सर्व खेळाडू तिच्याभवती जमले, चिंता वाढवणारी घटना

Monsoon Tourism: पावसाने दडी मारताच ताम्हिणी घाट-देवकुंड पर्यटन ठप्प; अंधारबन, खजिना ट्रेकवर शुकशुकाट

Donald Trump: ''नरेंद्र मोदी पंतप्रधान असेपर्यंत भारतावर हल्ला झाला तर..'', डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान अन् जगभरातील नेत्यांच्या भूवया उंचावल्या

‘बी-२’चा ‘जीआर’ महिनाभरात! सोलापुरातील १२५ वर्षे जुन्या चाळींमधील प्रत्येक कुटुंबास मिळणार काही हजारांत जागेची मालकी; आमदार देवेंद्र कोठेंचा यशस्वी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT