corona updates corona updates
देश

Covid: सिंगापूरनंतर भारतातही पसरला कोरोनाचा नवा प्रकार; 300 हून अधिक लोकांना संसर्ग

Covid In India: भारतात, 290 लोकांना कोविड-19 चा उप-प्रकार KP.2 आणि 34 लोकांना KP.1 चा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

आशुतोष मसगौंडे

भारतात, 290 लोकांना कोविड-19 चा उप-प्रकार KP.2 आणि 34 लोकांना KP.1 चा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सिंगापूरमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढण्यास हे दोन्ही उप-प्रकार जबाबदार आहेत. हे दोन्ही JN1 प्रकाराचे उपवेरियंट आहेत आणि हॉस्पिटलायझेशन आणि गंभीर आजाराशी संबंधित नाहीत. त्यामुळे काळजी करण्याचे किंवा घाबरण्याचे कारण नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय सार्स-कोव-2 जीनोमिक्स कंसोर्टियमने या प्रकरणाची दखल घेतली आहे. कोरोनाचे नवीन रूपे उदयास आल्यास त्याचा आपण प्रतिकार करू शकतो असे सांगितले आहे. भारतीय सार्स-कोव-2 जीनोमिक्स कंसोर्टियमच्या मते, सात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये KP.1 ची एकूण 34 प्रकरणे नोंदवली गेली, त्यापैकी 23 प्रकरणे एकट्या बंगालमध्ये नोंदवली गेली आहेत.

याव्यतिरिक्त महाराष्ट्रात चार, गुजरातमध्ये दोन, राजस्थानमध्ये दोन, गोव्यात एक, हरियाणामध्ये एक आणि उत्तराखंडमध्ये एक रुग्ण आढळून आला आहे.

KP.2 उप-प्रकारची 290 प्रकरणे समोर आली आहेत, त्यापैकी सर्वाधिक 148 प्रकरणे एकट्या महाराष्ट्रात आहेत.

सिंगापूरमध्ये अलीकडच्या काही दिवसांत कोविड-19 ची लाट दिसली आहे आणि 5 ते 11 मे दरम्यान KP.1 आणि KP.2 च्या सबव्हेरिएंट्सच्या संसर्गाची 25,900 प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

KP.1 आणि KP.2 प्रकार सिंगापूरमध्ये वेगाने पसरत आहे. 5 मे ते 11 मे पर्यंत एकट्या सिंगापूरमध्ये जवळपास 26 हजार केसेसची नोंद झाली आहे.

विशेष बाब म्हणजे या सर्व प्रकरणांपैकी दोन तृतीयांश प्रकरणे फक्त KP.1 प्रकाराशी संबंधित आहेत. KP.1 आणि KP.2 रूपे ज्या गटाशी संबंधित आहेत त्यांना FLiRT असे नाव देण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : निळी मफलर डोळ्यावर गॉगल, राज ठाकरे मेळाव्याच्या स्थळी दाखल

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

Anil Parab : मनसे-ठाकरे गटाची युती होणार? अनिल परब यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'आजचा हा मेळावा म्हणजे...'

SCROLL FOR NEXT