mucormycosis
mucormycosis mucormycosis
देश

कर्नाटकात दोन मुलांना ब्लॅक फंगसची लागण; रुग्णसंख्या १२५० वर

वृत्तसंस्था

रविवारी दिवसभरात १ हजार २५० रुग्ण आढळून आले. त्यापैकी १ हजार १९३ जणांवर उपचार करण्यात येत आहेत. गेल्या २४ तासात कर्नाटकमध्ये २० हजार ३७८ कोरोनाचे नवे रुग्ण सापडले आहेत.

बंगळुरू : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने आधीच हैराण झालेल्या नागरिकांपुढे ब्लॅक फंगस हीआणखी एक डोकेदुखी उभी राहिली आहे. कोरोनापेक्षाही अधिक धोकादायक असलेल्या ब्लॅक फंगस म्हणजेच म्युकरमायकोसिसच्या रुग्णांमध्ये गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. कर्नाटकमध्ये रविवारी (ता.३०) दोन मुलांना ब्लॅक फंगसची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. तेथे आतापर्यंत ब्लॅक फंगसचे १ हजार २५० रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे चिंतेत आणखीणच भर पडली आहे. (In Karnataka 1250 black fungus cases reported on Sunday)

बल्लारी जिल्ह्यातील ११ वर्षाची मुलगी आणि चित्रदुर्ग जिल्ह्यातील १४ वर्षाच्या मुलाला ब्लॅक फंगसची लागण झाली आहे. ही दोन्ही मुले शेतमजूरांच्या कुटुंबातील आहेत. या दोघांवर गव्हर्नमेंट बोवरिंग अॅण्ड लेडी कर्झन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ते दोघेही अॅक्युट जुवेनाइल डायबेटिस (AJD)ने ग्रस्त आहेत, अशी माहिती एका आरोग्य अधिकाऱ्याने पीटीआयशी बोलताना दिली.

रविवारी दिवसभरात १ हजार २५० रुग्ण आढळून आले. त्यापैकी १ हजार १९३ जणांवर उपचार करण्यात येत आहेत. गेल्या २४ तासात कर्नाटकमध्ये २० हजार ३७८ कोरोनाचे नवे रुग्ण सापडले आहेत. तसेच ३८१ जणांचा मृत्यू झाला आहे. कर्नाटकमध्ये आतापर्यंत २५ लाख ८७ हजार ८२७ जणांना कोरोनाची लागण झाली होती. सध्या राज्यात ३ लाख ४२ हजार ३१ सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत २८ हजार ६७९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

ब्लॅक फंगसबाबत रोज नव्याने तथ्य समोर येत आहेत. या संसर्गाचे निदान झालेल्यांपैकी १५ टक्क्यांहून अधिक रुग्ण असे आहेत, ज्यांना कोरोना कधीच झाला नव्हता. तर मधुमेहाने त्रस्त असलेल्या लोकांची संख्या जवळपास ५५ टक्के आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली.

डॉ. हर्ष वर्धन पुढे म्हणाले की, आतापर्यंत १८ राज्यांत ब्लॅक फंगसचे ५ हजार ४२४ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ४ हजार ५५६ केसेस अशा आहेत, ज्यांना याआधी कोरोनाची लागण झाली होती. ब्लॅक फंगसच्या उपचारांसाठी केंद्राने अ‍ॅम्फोटेरिसिन-बी च्या नऊ लाख लसीच्या कुप्यांचे आदेश जारी केले आहेत. सात दिवसांत तीन लाख कुपी उपलब्ध होतील.

देशभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Latest Marathi News Live Update :उद्धव ठाकरे यांची आज अलिबागमध्ये सभा

SCROLL FOR NEXT