काँग्रेस esakal
देश

Congress : मध्यप्रदेशात काँग्रेसचा पाठिंबा ‘फॉरवर्ड ब्लॉक’ला

या मतदारसंघांमध्ये समाजवादी पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज फेटाळण्यात आला होता

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : काँग्रेसने मध्यप्रदेशात मित्रपक्ष समाजवादी पक्षाला सोडलेल्या खजुराहो लोकसभा मतदारसंघामध्ये आता ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्ष फॉरवर्ड ब्लॉकच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. या मतदारसंघांमध्ये समाजवादी पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज फेटाळण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने हा निर्णय घेतला आहे.

काँग्रेसच्या माध्यम विभागाचे सरचिटणीस यांनी निवेदन जारी करून पक्षाच्या या निर्णयाची माहिती दिली. काँग्रेसने मध्यप्रदेशात खजुराहो हा मतदारसंघ समाजवादी पक्षासाठी सोडला होता मात्र, खजुराहोमध्ये मीरा यादव या समाजवादी पक्षाच्या महिला उमेदवाराच्या अर्जामध्ये त्रुटी आढळल्याने अर्ज बाद ठरला. हा प्रकार सत्तेचा गैरवापर असल्याची टीका जयराम रमेश यांनी केली. लोकशाहीच्या सर्व मर्यादा धुडकावून भाजपला समाजवादी पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात यश आले. त्यामुळे आता काँग्रेसने खजुराहोमध्ये फॉरवर्ड ब्लॉकचे उमेदवार आर. बी. प्रजापती यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे, असे जयराम रमेश यांनी स्पष्ट केले.

राहुल-अखिलेश यांचा संयुक्त प्रचार

उत्तर प्रदेशात १७ एप्रिलला राहुल गांधी आणि अखिलेश यादव गाझियाबादमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत, असे जयराम रमेश यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Mumbai Trains: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १७ जुलैपर्यंत पुणे-मुंबई २५ गाड्यांचे मार्ग बदलले, दौंड-मनमाड मार्गे गाड्या वळवल्या..

Latest Marathi News Live Update : लाडकी बहीण योजनेतून 90 लाखांपेक्षा जास्त महिलांची नावे वगळली; सर्वाधिक संख्या बीड जिल्ह्यातील

Maharashtra land Acquisition: भूसंपादन प्रक्रियेला गती देण्यासाठी राज्याचा मोठा निर्णय; १०३ विशेष भूसंपादन अधिकारी पदांची पुनर्रचना, प्रकल्पांना मिळणार वेग

Kolhapur Monsoon Rainfall : धरण क्षेत्रांत 41 दिवसांत 36 वेळा अतिवृष्टी; सर्वाधिक पाटगाव क्षेत्रात, सर्फनालामध्ये 24 तासांत 347 मिमी.ची नोंद

उत्तम गुंतवणूक : एलेनबारी इंडस्ट्रियल गॅसेस (शुक्रवारचा बंद भाव : रु. २९४.२५)

SCROLL FOR NEXT