IT Raid on Chinese Mobile Firms esakal
देश

देशभरात चिनी मोबाईल कंपन्याच्या कार्यालयांवर आयकर विभागाच्या धाडी

सकाळ डिजिटल टीम

IT Raid on Chinese Mobile Firms : आयकर विभागाने (Income Tax department) देशातील अनेक भागात चिनी मोबाईल कंपन्यांशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले आहेत. या चिनी मोबाईल कंपन्यांच्या (Chinese mobile firms) विरोधात देशातील अनेक शहरांमध्ये छापेमारी करण्यात आली. चिनी कंपनीकडून करांमध्ये अनियमितता केली असल्याच्या तक्रारी आयकर विभागाकडे आल्याचे सांगण्यात येत आहे, त्यानंतर ही छापेमारी करण्यात येत आहे.

बुधवारी सकाळपासून आयटी अधिकाऱ्यांनी छापे टाकण्यास सुरुवात केली. करामध्ये अनियमितता केल्याचा आरोपानंतर आयकर विभागाकडून दिल्ली, नोएडा, गुरुग्राम, मुंबई, हैदराबाद, बंगळुरूसह अनेक शहरांमध्ये सकाळी नऊ वाजल्यापासून करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. इन्कम टॅक्स विभागाने चीनी मोबाईल कंपन्या Xiaomi आणि Oppo यासह इतर अनेक कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकारी, संचालक आणि सीएफओ यांच्यावर छापे टाकले आहेत.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, अनेक प्रोडक्शन युनिट्स, कॉर्पोरेट ऑफीसेस आणि चिनी मोबाईल फोन कंपन्यांची गोदामे यांची झडती सुरू आहे. मात्र, या छाप्यात विभागाच्या हाती कोणती कागदपत्रे किंवा अन्य वस्तू सापडल्या आहेत, याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही.याआधी ऑगस्ट महिन्यात आयकर विभागाने झेडटीएफ या चिनी कंपनीवर आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली होती. कंपनीच्या भारतातील प्रमुखांची आयकर विभागाने चौकशी केली होती.

दरम्यान भारतात स्मार्टफोनची बाजारपेठ ही सुमारे 2.5 लाख कोटी रुपयांची आहे. यामध्ये 70 टक्के वाटा हा चीनी कंपन्यांचा आहे. केंद्र सरकारने संसदेत माहिती दिली होती की, सध्या देशात 92 चिनी कंपन्या रजीस्टर्ड आहेत, त्यापैकी 80 कंपन्या व्यवसाय करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Dindori Car Accident : नाशिकच्या दिंडोरीत कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत, ​स्नेहसंमेलन आटोपून घरी परतताना घटना

CSK vs PBKS Live: चेन्नई सुपर किंग्स 'घरी'पण हरले! पंजाब किंग्सचे फलंदाज चेपॉकवर बरसले, श्रेयसचा संघ IPL 2026 Point Table मध्ये अव्वल

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

SCROLL FOR NEXT