Mansukh Mandaviya Sakal
देश

टेलिकम्युनिकेशन सुविधा वाढवा! केंद्रीय आरोग्यमंत्री मंडावियांचे आवाहन

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर वेळेवर आरोग्यसुविधा पुरविण्यासाठी दूरध्वनी समुपदेशन सेवा(टेलिकम्युनिकेशन) वाढविण्याचे आवाहन मनसुख मंडाविया यांनी राज्यांना केले.

पीटीआय

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर वेळेवर आरोग्यसुविधा पुरविण्यासाठी दूरध्वनी समुपदेशन सेवा(टेलिकम्युनिकेशन) वाढविण्याचे आवाहन मनसुख मंडाविया यांनी राज्यांना केले.

नवी दिल्ली - कोरोनाच्या (Corona) तिसऱ्या लाटेत (Third Wave) रुग्णांची (Patient) संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर वेळेवर आरोग्यसुविधा (Health Facility) पुरविण्यासाठी दूरध्वनी समुपदेशन सेवा (टेलिकम्युनिकेशन) (Telecommunication) वाढविण्याचे आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया (Mansukh Mandaviya) यांनी आज राज्यांना केले. देशातील नऊ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. चाचण्या वाढविण्याचे आवाहनही त्यांनी केले. जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, चंडीगड, उत्तराखंड, हरियाना, दिल्ली, लडाख आणि उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री सहभागी झाले होते.

अतिरिक्त दूरसंचार केंद्रे सुरू करण्याचे आवाहनही यावेळी मंडाविया यांनी केले. त्यामुळे, गरजूंना टेलिकम्युनिकेशनच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला मिळेल. केंद्र सरकारच्या ई-संजीवनी टेलिमेडिसीन प्रणालीने अडीच कोटींहून अधिक गरजूंना घरबसल्या वैद्यकीय सेवेची सुविधा दिली. ही सेवा ‘गेम चेंजर’ ठरेल. तसेच दुर्गम भागातील विशेषतः: देशाच्या ईशान्येकडील राज्यांतील नागरिकांना तिचा फायदा होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

गृहविलगीकरणातील रुग्णांवर लक्ष ठेवा

आरोग्यमंत्री मंडाविया पुढे म्हणाले, की सामान्य जनतेबरोबरच आरोग्यतज्ज्ञांच्या सोयीसाठी दूरसंचार केंद्रे २४ तास सुरू ठेवावीत. गरजूंची धावपळ व प्रवास टाळण्यासाठी गटपातळीवर, प्राथमिक किंवा माध्यमिक आरोग्यकेंद्रातही अशा प्रकारे वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याची सेवा पुरवावी. घरातच विलगीकरणात असलेल्या कोरोना रुग्णांचे राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वानुसार निरीक्षण करावे. त्यामुळे, गृहविलगीकरणातील गंभीर रुग्णांना वेळेवर वैद्यकीय मदत मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: आनंदाची बातमी! मुंबई लोकलच्या 'या' मार्गावर १० अतिरिक्त ट्रेन चालवणार, २ नवीन स्थानके सुरू होणार

Viral Video: प्राजक्ता माळीचे योगासने पाहिले का? सोशल मीडियावर व्हिडिओ केला पोस्ट, नेटकरी म्हणाले...

Astrology Prediction : कितीही प्रयत्न करा 'या' राशीच्या लोकांचं लग्न टिकत नाही! आयुष्यभर राहतो तणाव..पाहा 'या' जोड्या कोणत्या?

Latest Marathi Breaking News Live: बच्चू कडूच्या विखे पाटलांवरील वक्तव्यानंतर भाजप आमदार प्रवीण तायडे आक्रमक

Pakistan Military: पाकमध्येही आता सरसेनाप्रमुखपद; सरकारकडून घटनादुरुस्तीसाठी विधेयक

SCROLL FOR NEXT