independence day 2020, 15 August celebrations, PM Modi speech 
देश

independence day 2020 : मर्यादित पाहुणे; PPE किटमध्ये दिसतील जवान... जाणून घ्या कसा असेल लाल किल्ल्यावरील नजारा

सुशांत जाधव

कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जनजीवन विस्कळीत झाले आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या चिंता वाढविणारी अशीच आहे. स्वातंत्रदिनाच्या कार्यक्रमावरही कोरोना प्रादुर्भावाचा परिणाम जाणवणार आहे. यंदाही लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या स्वतंत्र दिनी कार्यक्रमात काही अमुलाग्र बदल अनुभवायला मिळेल. दरवर्षी प्रमाणे यंदा लाल किल्ल्यावर गर्दी दिसणार नाही. मर्यादित पाहुण्यांच्या उपस्थितीत उत्साहात कार्यक्रम पार पाडण्यात येईल. सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांना ही  वैयक्तिक सुरक्षा साधनांचा (पीपीई किट) वापर करणे अनिवार्य असेल. कार्यक्रमासाठी जे फोटो जर्नलिस्ट सहभागी होणार आहेत त्यांनाही कोरोना चाचणीस सामोरे जावे लागेल. 

स्वातंत्र्य दिनाच्या तयारीसाठी कार्यरत असलेल्या गृहमंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या कार्यक्रमाला मर्यादित लोकांची उपस्थिती असेल. 140 पाहुण्यांमध्ये कॅबिनेट मंत्री, वरिष्ठ नोकरशाह आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश उपस्थितीत राहतील. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात कोणत्याही व्हीआयपी व्यक्तिंच्या पती किंवा पत्नीला निमंत्रण देण्यात आलेले नाही. कार्यक्रमावेळी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करता यावे, या उद्देशाने मर्यादित लोकांनाच प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहितीही संबंधित अधिकाऱ्याने दिली. 

यंदाच्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाच्या प्रोटोकॉलनुसार,  कोणत्याही पाहुण्याला आपल्या जोडीदाराला सोबत आणता येणार नाही. एवढेच नाही तर यंदा भोजन व्यवस्थाही दिसणार नाही. स्वातंत्र्य सैनिकांनाही यंदाच्या कार्यक्रमाला निमंत्रित करण्यात आलेले नाही. कार्यक्रमासाठी प्रवेश देण्यात येणाऱ्या फोटोग्राफरची संख्याही कमी असेल. मागील वर्षी 80 ते 90 फोटोग्राफर्संना प्रवेश देण्यात आला होता. यंदा केवळ 10 फोटोग्राफर्संना परवानगी दिली जाईल. बुधवारीच या फोटोग्राफर्संची कोरोना चाचणीही घेण्यात आली आहे.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT